Home » ठळक बातम्या, विज्ञान भारती » भारतात फेसबूक युजर्स १० कोटींवर

भारतात फेसबूक युजर्स १० कोटींवर

पुणे, (१० एप्रिल) – माहिती तंत्रज्ञानाचे युग सुुरू झाल्यापासून भारतात आणि जगातही प्रत्येक महिना हा त्याच्या वापराबाबत नवा विक्रम करणारा ठरला आहे. अमेरिकेनंतर भारतात फेसबूक या सोशल साईटच्या युजर्सची संख्या सर्वाधिक असून त्यांचे १० कोटी ऍक्टिव्ह युजर्स असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. दर महिन्याला भारतात १० कोटी युजर्स फेसबूक वापरतात आणि विशेष म्हणजे त्यापैकी ८ कोटी ४० लाख युजर्स मोबाईलवर फेसबूक ऍक्सेस करतात, असे फेसबूकच्या भारत विस्तार मोबाईल भागीदार विभागाचे प्रमुख केव्हिन डिसुझा यांनी म्हटले आहे. डिसुझा यांचे म्हणणे असे की, फेसबूकचे ध्येयच लोकांना शेअर करण्याची ताकद पुरविणे आणि जग अधिक खुले करून कनेक्ट करणे हेच आहे. फेसबूकने नुकतीच इंटरनेट डॉट ओआरजी ही जागतिक भागीदारी केली असून त्याद्वारे जगभरातील ५ अब्ज लोकांना ऍक्सेस पुरविणे साध्य होणार आहे. फेसबूकच्या या विचारसरणीशी साम्य असलेले भागीदार फेसबूकला हवे आहेत, असेही ते म्हणाले.
फेसबूकने भारतात त्यांचे पहिले कार्यालय २०१० साली हैदराबाद येथे उघडले. त्यानंतर अल्पावधीतच फेसबूक युजर्सची संख्या ८० लाखांवर गेली होती. आता ही १० कोटींचा टप्पा ओलांडून गेली आहे. आकडेवारीनुसार डिसेंबर २०१३ अखेरपर्यंत फेसबूकचे जगात १.२३ अब्ज युजर्स आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=12606

Posted by on Apr 11 2014. Filed under ठळक बातम्या, विज्ञान भारती. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, विज्ञान भारती (2432 of 2466 articles)


बंगळुरू, (७ एप्रिल) - प्रख्यात सिनेमॅटोग्राफर आणि दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते व्ही. के. मूर्ती यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ...

×