Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » भारतात मोठ्या हल्ल्यांची योजना

भारतात मोठ्या हल्ल्यांची योजना

  • आयएसआय, तोयबा, जैशसारख्या संघटना टपून
  • ‘रॉ’चा धक्कादायक अहवाल

RAW - research and analysis wingनवी दिल्ली, [२२ सप्टेंबर] – भारत-पाकिस्तान लष्कर आणि बीएसएफ व रेंजर्स स्तरावर सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यावर करार झाल्यामुळे निराश झालेल्या पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेने काही जहाल दहशतवादी गटांना सोबत घेऊन जम्मू-काश्मीर आणि भारतात इतरत्र मोठे दहशतवादी हल्ले करण्याची योजना तयार केली आहे, असा धक्कादायक खुलासा रीसर्च ऍण्ड ऍनेलॅसिस विंग अर्थात ‘रॉ’ने केला आहे.
‘रॉ’ने याबाबत देशातील सर्वच गुप्तचर संस्थांना सतर्क करतानाच, केंद्रीय गृहमंत्रालयालाही आपला अहवाल सोपविला आहे. लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद यासारख्या अतिरेकी गटांसोबत आयएसआयने ही योजना तयार केली आहे. भारतात सध्या सणासुदीचा काळ सुरू असल्याने सर्वच शहरांमधील बाजारपेठा गर्दीने फुलल्या आहेत. या गर्दीच्या ठिकाणीच दहशतवादी हल्ले घडविण्याचा आयएसआयचा प्रयत्न राहणार आहे, असे ‘रॉ’च्या इशार्‍यात स्पष्ट करण्यात आले आहे.
सीमेवरील गोळीबाराच्या माध्यमातून आयएसआयला भारतात अतिरेकी घुसविणे शक्य व्हायचे. पण, नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर शांतता कायम राखण्याचा करार दोन्ही देशांमध्ये झाला आहे. त्यामुळे आयएसआयची प्रचंड निराशा झाली. आता कुठल्याही स्थितीत अतिरेकी भारतात पाठवायचे आणि मोठे हल्ले करायचे, अशी आयएसआयची व्यूहरचना आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=24021

Posted by on Sep 23 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (1419 of 2453 articles)


=एका डोजची किंमत १० हजार= पुणे, [२२ सप्टेंबर] - विविध रोगांवरील लस बनविणारी प्रसिद्ध सीरम या कंपनीने डेंग्यूवर उपचारासाठी डेंग्यूवरील ...

×