Home » कृषी, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » भारतात यंदा मुसळधार पाऊस, ऑस्ट्रेलियाचा दावा

भारतात यंदा मुसळधार पाऊस, ऑस्ट्रेलियाचा दावा

India-monsoon-rain-4मुंबई, [२३ एप्रिल] – यंदा चांगल्या पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. यंदाचा पाऊस शंभर टक्क्यांच्या सरासरीपेक्षा अधिक पडणार असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले असून जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या वेधशाळेनेही यावर शिक्कामोर्तब केले आहे. कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव दिनेशकु मार जैन यांनी मान्सूनसंदर्भात ही माहिती दिली आहे.
यंदा पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सलग तीन वर्षांपासून हिंदी महासागरात ‘एल निनो’ या कमी दाबाच्या पट्‌यामुळे देशभरात पावसाने दगा दिला होता. याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला होता. मात्र यंदा पाऊस शंभर टक्क्यांच्या सरासरीपेक्षा अधिक पडणार असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे.
जपान आणि आस्ट्रेलियाच्या वेधशाळेनेही मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली असल्याची माहिती जैन यांनी दिली. दोन्ही देशांच्या वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, हिंदी महासागरातील तापमान वाढले असून, यामुळे मोठ्‌या प्रमाणात पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. तसेच पावसाला अनुकूल असणारे दमट वातावरणही त्यामुळे निर्माण होत असल्याचे सांगितले आहे.
२०१५ ते १६ पासून ‘एल निनो’ हळूहळू कमी होत आहे. या काळात दक्षिण गोलार्धात त्याचा वारावरणावर प्रभाव पडणार आहे. त्यामुळे सागरी प्रदेशात येणार्‍या देशांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता जपान व ऑस्ट्रेलियाच्या वेधशाळेने वर्तवली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27960

Posted by on Apr 23 2016. Filed under कृषी, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कृषी, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (447 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२२ एप्रिल] - राज्यसभेतील नामनियुक्त सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सत्ताधारी भाजपाने सुरू केली असून, यासाठी काही नावांवर शिक्कामोर्तब झाल्याचे ...

×