Home » ठळक बातम्या, नागरी, फिचर, राष्ट्रीय » भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’

भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’

=क्रिसिलचा दावा=
crisilनवी दिल्ली, [१८ जुलै] – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना ज्या चांगल्या दिवसांची ग्वाही दिली होती, ते दिवस आता फार दूर नाही. नजीकच्याच भविष्यात भारतीयांना चांगल्या दिवसांची प्रचिती येणार आहे, असे ‘क्रिसिल’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या पाहणीत दिसून आले आहे.
आर्थिक व्यवहारविषयक क्षेत्रात संशोधन करून त्यानुसार क्रमवारी निश्‍चित करणार्‍या या संस्थेने भारतातील स्थितीचा अभ्यास केला आहे. क्रिसिलच्या अहवालानुसार, नजीकच्याच भविष्यात भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ६ रुपयांपर्यंत कमी होतील. यामुळे मालवाहतूक आणखी स्वस्त होऊन, त्याच्या परिणामाने महागाईदेखील बरीच कमी होईल.
खाद्यपदार्थांच्या किमतीत मोठी घट होण्याची शक्यता असून, सध्या आकाशाला भिडलेल्या सोन्याच्या किमती प्रति तोळा २५ हजारांच्याही खाली येऊ शकतात. या काळात महागाई पूर्णपणे नियंत्रणात आणणे शक्य होणार असल्याचे भाकीत क्रिसिलने वर्तविले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत होत असलेली जबरदस्त घट, विदेशी गुंतवणूकदारांनी सोन्यातील गुंतवणुकीतून काढता पाय घेणे आणि मूळात गुंतवणुकीतच होत असलेली कमतरता ही यामागील मुख्य कारणे असल्याचे क्रिसिलने नमूद केले आहे.
पुढील वर्षात भारतीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती ४५ डॉलरपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर भारताला महागाई नियंत्रणात आणण्यास मोठी मदत मिळणार आहे. शिवाय, तेलाचे विपणन करणार्‍या कंपन्यांनाही फायदा होण्याची शक्यता असल्याने पेट्रोल-डिझेलच्या किमती लिटरमागे सहा रुपयांनी घसरण्याचा अंदाज आहे. खाद्यपदार्थ, सोने आणि स्टिलच्या किमती कमी होण्याचाही अंदाज आहे. त्यात प्रामुख्याने सोन्याच्या किमतीत मोठी घट होऊन, ते २४ हजार किंवा त्यापेक्षाही कमी किमतीचे होईल, असे या अहवालात म्हटले आहे.
ग्रीसवरील आर्थिक संकट दूर होण्यास अद्या काही कालावधी लागणार असून, चीनच्या अर्थव्यवस्थेची वाढही मंद गतीने होत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदीच्या वातावरणात कमी मागणीची स्थिती कायम असेल. क्रिसिलचे संचालक प्रसाद कोपरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जगात सर्वाधिक ऊर्जा वापरणार्‍या देशांमध्ये चीनचा समावेश असून, या देशाचा वाटा एक तृतियांश इतका आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23456

Posted by on Jul 19 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, फिचर, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, फिचर, राष्ट्रीय (1550 of 2454 articles)


=प्रशांत भूषण यांचे टीकास्त्र= नवी दिल्ली, [१८ जुलै] - प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव आम आदमी पार्टीत परतल्यास आपल्यास आनंदच ...

×