Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » भारतात स्वाईन फ्लूचा धोकादायक विषाणू

भारतात स्वाईन फ्लूचा धोकादायक विषाणू

swineflu h1n1वॉशिंग्टन, [१२ मार्च] – भारतात सध्या स्वाईन फ्लूचा खूपच फैलाव झाला आहे. स्वाईन फ्लूचा एच१ एन१ हा व्हायरस अधिक धोकादायक असल्याचे एमआयटीच्या संशोधकांच्या अभ्यासातून पुढे आले आहे. गेल्या वर्षभरात स्वाईन फ्लूमुळे भारतात तब्बल १,५०० जणांचा मृत्यू झाला आहे.
या अभ्यासानुसार, स्वाईन फ्लूने भारतात खूपच गंभीर आणि संसर्गजन्य रूप धारण केले आहे. तसेच याचा मनुष्याच्या शरीरावर कायमस्वरूपी परिणाम होत असल्याचेही यात म्हटले आहे. जो विषाणू आढळून येतोय्, तो हिमॅग्लुटिनीनमध्ये संक्रमित होऊन तो अधिक धोका निर्माण करत आहे. यामुळे रक्तातील लाल पेशींवर गंभीर परिणाम होतो. जुन्या विषाणूपेक्षा आताच्या विषाणूत आजार पसरविण्याची क्षमता अधिक का आहे, हे मात्र, दोन वर्षात या विषाणूवर झालेल्या अभ्यासातून समजू शकलेले नाही. तरी आताचा विषाणू हा अधिक धोकादायक असल्याचे सिद्ध झाले आहे.
२००९-२०१२ मध्ये जगभरात स्वाईन फ्लूमुळे १८,००० लोकांचा मृत्यू झाला होता. सध्या गुजरात आणि राजस्थानमधील स्वाईन फ्लूच्या रुग्णांकडे लक्ष देण्याची गरज आहे. या दोन राज्यात आतापर्यंत तब्बल २०,००० लोकांना याची लागण झाली आहे.
एमआयटीचा हा अहवाल भारतीय आरोग्य अधिकार्‍यांनी बनविलेल्या अहवालाच्या अगदी विरुद्ध असल्याचे दिसते. भारतीय अहवालानुसार २००९ मध्ये भारतात हा रोग उद्‌भवला तेव्हापासून यात काहीच फरक झालेला नाही.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21311

Posted by on Mar 13 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1928 of 2453 articles)


=आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मत= वॉशिंग्टन, [१२ मार्च] - आपल्या पायाभूत आराखड्यात काही धोरणात्मक बदल केल्यास येणार्‍या काही वर्षांमध्ये भारत ८ ते ...

×