Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » भारताने ड्रॅगनला शिकविला धडा

भारताने ड्रॅगनला शिकविला धडा

=मसूद प्रकरणाचे पडसाद=
india-china flagबीजिंग, [२२ एप्रिल] – ‘ठकासी व्हावे महाठक’ या उक्तीनुसार केंद्रातील मोदी सरकारने वर्ल्ड उईगर कॉंग्रेसचा (डब्ल्यूयूसी) कथित दहशतवादी नेता डोल्कून ईसा याला भारतात प्रवेश दिल्याने चीनचा प्रचंड जळफळाट झाला आहे. या निर्णयामुळे भारताने ड्रॅगनचे दात त्याच्याच घशात घातल्याचे आंतरराष्ट्रीय क्षेत्रात मानण्यात येत आहे.
मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याच्यावर बंदी घालण्यासाठी भारताने संयुक्त राष्ट्रसंघात शर्थीचे प्रयत्न केले होते. मात्र, चीनने नकाराधिकार (व्हेटो) वापरून मसूदवरील बंदीला विरोध केल्याने भारताला जोरदार झटका बसला होता. पण आता केंद्रातील मोदी सरकारने पलटवार करीत डोल्कून ईसा याला भारतात प्रवेश देऊन चीनला जबर दणका दिला आहे.
दरम्यान, चीनने भारताच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. ‘डोल्कून हा एक दहशतवादी आहे आणि त्याच्या विरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीसही जारी केला आहे. त्यामुळे त्याला पोलिसांच्या हवाली करण्याची सर्व देशांची जबाबदारी ठरते,’ असे चीनने म्हटले आहे. इंटरपोल आणि चीन पोलिसांनी जारी केलेल्या रेडकॉर्नर नोटीसनुसार डोल्कून हा दहशतवादी आहे. त्याला कायद्याच्या हवाली केले पाहिजे. हे सर्व देशांचे कर्तव्य आहे, असे चीनने म्हटले आहे.
चीनमधील मुस्लिमबहुल शिनजियांग भागातील दहशतवादामागे डोल्कून आणि त्याचे साथीदार आहेत, असा चीनचा दावा आहे. डोल्कून हा २८ एप्रिल ते १ मेपर्यंत धर्मशाला येथे राहणार आहे. तो दलाई लामांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. धर्मशाला येथूनच तिबेटचे विस्थापित सरकार आपले कामकाज चालविते. या सरकारला मात्र चीनची मान्यता नाही.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27952

Posted by on Apr 23 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (452 of 2458 articles)


नवी दिल्ली, [२३ एप्रिल] - सूफी संत ख्वाजा साहेब यांच्या श्रीनगरमधील दर्ग्यात मुस्लीम धर्मगुरू तब्बल एक हजार तिरंगे फडकवणार आहेत. ...

×