Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » भारताने रोजगाराच्या संधी हिरावल्या

भारताने रोजगाराच्या संधी हिरावल्या

=डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा आरोप, उद्या ठरणार भवितव्य=
donald_trumpकोलंबिया, [२८ फेब्रुवारी] – अमेरिकन अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेले रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी होणार्‍या शक्तिप्रदर्शनापूर्वी पुन्हा एकदा भारत आणि चीनवर रोजगाराच्या संधी हिरावल्याचा आरोप केला आहे.
अमेरिकेचा अध्यक्ष म्हणून निवडून आलो तर या सर्व नोकर्‍या परत आणीन, असे आश्‍वासन रियल इस्टेट क्षेत्रातील मोठे नाव आणि गेल्याच वर्षी राजकारणात आलेल्या ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना संबोधित करताना सांगितले. भारत, चीन, जपान आणि मेक्सिको यासारख्या देशांनी हिरावलेल्या नोकर्‍या परत मिळवून अमेरिकेला पुन्हा एक महान देश बनविण्याचे स्वप्न साकारणार असल्याचे ट्रम्प यांनी स्थानिक विमानतळावर जमलेल्या पाच हजार समर्थकांना संबोधित करताना सांगितले. अमेरिका-मेक्सिको सीमेवर सुरक्षा भिंत उभारून आयसिसला परतवून लावू, असेही ते म्हणाले.
ट्रम्प यांनी यावेळी दिलेल्या प्रत्येक आश्‍वासनानंतर उपस्थितांनी ‘युएसए, युएसए’, आणि ‘ट्रम्प…ट्रम्प’, अशी घोषणाबाजी केली. भारत हा अमेरिकेतून रोजगार हिरावणार्‍या देशांमध्ये आघाडीवर आहे, असा आरोपही ट्रम्प यांनी यावेळी बोलताना केला. चीन, जपान, मेक्सिको आणि व्हिएतनाम या देशांवर ट्रम्प असा आरोप नेहमीच करत आले आहेत.
देशभरात प्रचार करत असताना ट्रम्प यांना उत्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सर्व ११ राज्यांमध्ये मंगळवारी होणार्‍या निर्णायक लढतीत अध्यक्षपदासाठी त्यांना रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळेल की नाही, याचा निर्णय लागणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26944

Posted by on Feb 29 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (800 of 2458 articles)


=पंतप्रधान मोदींचे स्वप्न= बरेली, [२८ फेब्रुवारी] - देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना म्हणजे स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होईपर्यंत शेतकर्‍यांचे ...

×