Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » भारताला किंमत चुकवावी लागेल

भारताला किंमत चुकवावी लागेल

=टायगर मेमनची धमकी=
tiger memonमुंबई, [७ ऑगस्ट] – याकुब मेमनच्या फाशीची मोठी किंमत भारताला चुकवावी लागेल. आपल्या भावाचा बदला घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही, अशी धमकी मार्च १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील मुख्य सूत्रधार टायगर मेमनने दिली आहे.
मुंबई स्फोटमालिकेप्रकरणी याकुब मेमनला गेल्या ३० जुलै रोजी नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात फासावर लटकविण्यात येण्याच्या अर्धा तास आधी टायगरने त्याची आई हनिफाला फोन केला होता. सुमारे तीन मिनिटे आईशी बोलताना त्याने याकुबच्या फाशीचा बदला घेण्याची धमकी दिली. दरम्यान, त्याचे हे संभाषण मुंबई पोलिसांनी रेकॉर्ड केल्याचे वृत्त असले, तरी या वृत्ताचे पोलिसांनी खंडन केले आहे.
टायगरच्या फोनचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने प्रकाशित केले आहे. मुंबईच्या माहिम भागातील अल हुसैनी इमारतीत मेमन कुटुंबाचे वास्तव्य आहे. त्याच इमारतीतील लॅण्डलाईनवर ३० जुलैला सकाळी साडेपाचच्या सुमारास टायगरने फोन केला होता. मुंबई पोलिसांच्या दक्षता पथकाने त्यांचे संभाषण रेकॉर्ड केले आणि हा आवाज टायगर मेमनचाच असल्याचा दावाही केला. नंतर मात्र, पोलिसांनी घूमजाव केले.
आपण कुठून बोलत आहे, याबाबतची माहिती भारतीय गुप्तचर संस्थांना मिळू नये, यासाठी टायगरने आपले संभाषण अवघ्या तीन मिनिटातच संपविले. टायगरची आई हनिफा आधी फोनवर यायला तयार नव्हती. मात्र, कुटुंबातील एका सदस्याने तिला फोन दिला आणि भाईजानशी बोल, असे सांगितले. आईशी बोलताना टायगर सातत्याने बदल्याची भाषा बोलत होता. हनिफा रडतच म्हणाली की, ‘आता फार झाले, आधीच्या घटनेमुळे मी आपला एक मुलगा गमावला. आता आणखी काही पाहण्याची क्षमता माझ्यात नाही.’

Short URL: https://vrittabharati.in/?p=23598

Posted by on Aug 9 2015. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मुंबई-कोकण (1526 of 2452 articles)


=सरसंघचालकांच्या विधानाचा विपर्यास= नवी दिल्ली, [७ ऑगस्ट] - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे विधान तथ्यांचा विपर्यास करून ...

×