Home » कृषी, ठळक बातम्या, राष्ट्रीय » भारताला नव्या हरित क्रांतीची गरज : आनंद महिंद्रा

भारताला नव्या हरित क्रांतीची गरज : आनंद महिंद्रा

anand-mahindraनवी दिल्ली, [४ मार्च] – कृषी उत्पन्नात झालेली घट लक्षात घेता देशाला नव्या हरित क्रांतीची गरज आहे, असे मत महिंद्रा ग्रुपचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून मान्सूनचा अपेक्षित पाऊस पडलेला नाही. कृषी क्षेत्रापासून होणार्‍या उत्पन्नात घट झाली असताना आम्ही आयटी व ई-कॉमर्स यासारख्या झगमगाट असलेल्या क्षेत्रांमुळे इतके खुश आहोत की, कृषी हेच भारताचे मुख्य क्षेत्र असल्याचा आपल्याला सहज विसर पडला, असे आनंद महिंद्रा यांनी एका पुरस्कार वितरण समारंभात बोलताना सांगितले.
चालू आर्थिक वर्षात भारताने कृषी व संबंधित क्षेत्रात १.१ टक्के वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे. कृषी क्षेत्र सध्या संकटात आहे आणि शेतकरी आत्महत्या करताहेत. आतापर्यंत आम्ही कृषी क्षेत्रात खूप प्रगती केली आहे. हरित क्रांतीमुळे आम्हाला लाभही झाला आहे. परंतु, आता आम्हाला नव्या हरित क्रांतीची गरज आहे आणि हे शक्य आहे, असा विश्‍वासही महिंद्रा यांनी व्यक्त केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27008

Posted by on Mar 5 2016. Filed under कृषी, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कृषी, ठळक बातम्या, राष्ट्रीय (773 of 2453 articles)


=सुशीलकुमार शिंदेंनी हात झटकले= नवी दिल्ली, [४ मार्च] - २००४ साली अहमदाबादजवळील चकमकीत ठार झालेल्या इशरत जहॉंचे लष्कर-ए-तोयबा या पाकपुरस्कृत ...

×