Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » भारताला विशेष दर्जा देणारे विधेयक बारगळले

भारताला विशेष दर्जा देणारे विधेयक बारगळले

=… तर मिळाला असता जागतिक भागीदारीचा दर्जा=
India-US-flagsवॉशिंग्टन, [१५ जून] – भारताला अमेरिकेचा जागतिक धोरणात्मक आणि संरक्षण भागीदार म्हणून मान्यता देणारे विधेयक सिनेटमध्ये पारित होऊ शकले नाही. याबाबतच्या नियमात आवश्यक ती दुरुस्ती सभागृहात फेटाळून लावण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात अमेरिकन संसदेला संबोधित केले होते. त्याच दिवशी ज्येष्ठ रिपब्लिकन सदस्य जॉन मॅक्केन यांनी राष्ट्रीय संरक्षण अधिकार कायद्यात दुरुस्ती सुचविणारे विधेयक सादर केले होते. हे विधेयक पारित झाले असते, तर अमेरिकेचा जागतिक धोरणात्मक आणि संरक्षण भागीदार म्हणून भारताला मान्यता मिळाली असती.
आपल्या अमेरिका दौर्‍यात नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेतल्यानंतर अमेरिकेने भारताला मुख्य संरक्षण भागीदार म्हणून मान्यता दिली होती. यामुळे संरक्षणविषयक व्यापार आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाचा द्विपक्षीय मार्ग मोकळा झाला आहे. तसेच अमेरिकेच्या अतिशय जवळच्या मित्रराष्ट्रांमध्ये भारताला स्थानही मिळाले आहे. विशेष म्हणजे, याबाबत विधेयकात असलेली तरतूद ८५ विरुद्ध १३ अशा मोठ्या फरकाने पारित झाली आहे. पण, भारताला जागतिक धोरणात्मक आणि संरक्षण भागीदाराचा दर्जा देणारी दुरुस्ती पारित होऊ शकली नाही.
भारताला हा विशेष दर्जा देणारी दुरुस्ती पारित न होणे अमेरिकेच्या हितात नाही. सिनेटच्या व्यवहारामुळे माझी फार निराशा झाली आहे, अशी प्रतिक्रिया मॅक्केन यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28610

Posted by on Jun 16 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (236 of 2458 articles)


आघाडी सरकारचा नवा गैरव्यवहार उघड माजी सनदी अधिकार्‍याने केला गौप्यस्फोट मुंबई, [१४ जून] - महाराष्ट्रात सलग १५ वर्षे सत्तेत ...

×