Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » भारताला सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व मिळावे

भारताला सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व मिळावे

  • ओबामा यांचे प्रतिपादन
  • दहशतवाद्यांना आश्रय देणे बंद करा; पाकला ठणकावले
  • २६/११ च्या दोषींना शिक्षा व्हायलाच हवी

A tear runs down the face of U.S. Democratic presidential nominee Obama during a campaign rally in Charlotteनवी दिल्ली, [२३ जानेवारी] – संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळालयाच हवे, असे स्पष्ट प्रतिपादन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आज शुक्रवारी केले. याचवेळी ओबामा यांनी दहशतवादी कारवायांवरून पाकिस्तानलाही ठणकावले. पाकने आपली भूमी दहशतवाद्यांकरिता नंदनवन म्हणून उपलब्ध करून देणे ही बाब आम्ही कधीच मान्य करू शकणार नाही. आपल्या भूमीतून सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांवर पाकने ताबडतोब आळा घाळायला हवा आणि २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दोषींनाही कठोर शिक्षा करायलाच हवी, अशी ताकीद ओबामा यांनी दिली.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अनेक शांतता मोहिमांमध्ये भारताने महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. हा देश अण्वस्त्रांनी सज्ज असतानाही त्यांचा आण्विक कार्यक्रम पूर्णपणे शांततेसाठीच आहे. दहशतवादाचा नायनाट करून जगात शांतता प्रस्थापित करण्याचा भारताचा निर्धार आणि त्यादिशेने भारतातर्फे घेण्यात येणारा पुढाकार कौतुकास्पद असाच आहे. जागतिक व्यवहारात भारताची आजवरची कामगिरी लक्षात घेता, या देशाला सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व मिळायलाच हवे, असे मला मनापासून वाटते, असे ओबामा यांनी भारत दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर दिलेल्या मुलाखतीत बोलताना सांगितले.
दहशतवादावर बोलताना ओबामा यांनी अमेरिकेची भूमिका स्पष्ट केली. या लढ्यात पाकिस्तानने अमेरिकेला सहकार्य केले असले, तरी या देशाने आपली भूमी दहशतवाद्यांना नंदनवन म्हणून उपलब्ध करून द्यावी आणि इतर देशांविरोधात कारवाया करण्यासाठी आपल्या भूमीचा वापर होऊ द्यावा, ही बाब आम्ही कदापि मान्य करणार नाही, असे ओबामा यांनी सांगितले.
आमचा दहशतवादविरोधी लढा कायमच राहील. या लढ्यात अमेरिका आणि भारत परस्परांना नेहमीच सहकार्य करेल. ९/११ च्या अमेरिकेवरील हल्ल्यात अमेरिकन नागरिकांसोबत काही भारतीयांचाही मृत्यू झाला होता आणि २६/११ च्या मुंबई हल्ल्यात भारतीयांसोबतच काही अमेरिकन नागरिकांनीही आपला जीव गमावला होता. यापूर्वीच्या भारत दौर्‍याच्या काळात मी सर्वप्रथम मुंबईला भेट दिली होती. ताज हॉटलच्या परिसरात जाऊन मृतांना श्रद्धांजली वाहून जखमींचीदेखील भेट घेतली होती आणि आपल्या नागरिकांचे रक्षण करण्यासाठी तसेच देशाची सुरक्षा अबाधित राखण्यासाठी आम्ही दोन्ही देश संयुक्तपणे लढणार आहोत, असा ठोस संदेश दहशतवाद्यांना दिला होता, असे ओबामा यांनी स्पष्ट केले.
उद्या आगमन
दरम्यान, प्रजासत्ताकदिनाचे मुख्य अतिथी असलेले बराक ओबामा यांचे रविवार २५ जानेवारीला भारताच्या तीन दिवसांच्या भेटीवर आगमन होत आहे. सोमवारी दिल्लीत आयोजित प्रजासत्ताकदिनाच्या मुख्य सोहळ्यात ते उपस्थित राहणार असल्याने राजधानीत जमिनीपासून तर आकाशापर्यंत सुरक्षेचे अद्‌भुत कवच तयार करण्यात आले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20015

Posted by on Jan 24 2015. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (2182 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२३ जानेवारी] - अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा भारतात येणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडेकोट करण्यात आली आहे. ...

×