Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » भारताला स्थायी सदस्यत्व देण्यासाठी वचनबद्ध

भारताला स्थायी सदस्यत्व देण्यासाठी वचनबद्ध

=युनोच्या विस्ताराला विरोध म्हणजे पाठिंब्याचा अभाव नाही, अमेरिकेची स्पष्टोक्ती=
UNO united-nations-buildingवॉशिंग्टन, [२१ सप्टेंबर] – संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेचा विस्तार करण्याच्या भारताच्या कल्पनेला आमचा विरोध असला, तरी या सर्वोच्च जागतिक मंडळात भारताचा स्थायी सदस्य म्हणून समावेश करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असे अमेरिकेने स्पष्ट केले.
संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळायलाच हवे, असे मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अनेकदा व्यक्त केले आहे. भारताबाबत अमेरिकेची जी बांधिलकी आहे, त्यापासून कुणीही मागे जाणार नाही, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयातील दक्षिण आणि मध्य आशियाचा व्यवहार पाहणार्‍या विभागातील उपमंत्री निशा देसाई बिस्वाल यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
सुरक्षा परिषदेचा विस्तार करून भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळावे, या मुद्यावर ओबामा प्रशासनात दुहेरी मतप्रवाह आहे, असे ओबामा प्रशासनातील काही अधिकार्‍यांच्या अलीकडील वक्तव्यांवरून दिसून आले होते. याविषयी विचारण्यात आले असता, बिस्वाल यांनी व्हाईट हाऊसची भूमिका स्पष्ट केली.
सुरक्षा परिषदेचा विस्तार कशा पद्धतीने करायचा, हा अतिशय किचकट मुद्दा आहे. पण, त्यावर मी जास्त भाष्य करणार नाही. कारण, हा मुद्दा माझ्या क्षेत्राबाहेरचा आहे. एवढे मात्र खरे की, भारताचा सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्य म्हणून समावेश व्हावा, यासाठी अमेरिका वचनबद्ध आहे आणि आम्ही ती पूर्ण करणार आहोत, असेही त्या म्हणाल्या.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23985

Posted by on Sep 22 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (1433 of 2458 articles)


=सुप्रीम कोर्टाचेही शिक्कामोर्तब= नवी दिल्ली, [२१ सप्टेंबर] - केंद्र आणि दिल्ली सरकार यांच्यात विविध मुद्यांवरून सुरू असलेल्या संघर्षामुळे दिल्लीकरांना राज्यकारभाराच्या ...

×