Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » भारतावर येणार अन्नधान्य-पाण्याचे भीषण संकट!

भारतावर येणार अन्नधान्य-पाण्याचे भीषण संकट!

=पर्यावरण तज्ज्ञांचे भाकित=
water scarcity-dushkalनवी दिल्ली, [२० जून] – भारतासह हिमालयाच्या परिसरातील सर्वच देशांनी स्वत:स पर्यावरणास अनुकूल ठेवले नाही तर भविष्यात अन्न व पाणी या माणसाच्या मूलभूत गरजांसाठी लोकांना झगडावे लागेल, असे भाकित पर्यावरण तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आले आहे.
स्थानिक नॉलेज फोरम ऑन क्लायमेट रिसायलेंट डेव्हलपमेंट इन हिमालयन अँड डाऊनस्ट्रीम रिजन्स या विषयावर एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात भारत, चीन, नेपाळ आणि बांगलादेशासह जगभरातील पर्यावरण तज्ज्ञांना निमंत्रित करण्यात आले होते.
दरम्यान, याच चर्चासत्रात भविष्यातील अन्नधान्य आणि पाण्याच्या भीषण संकटावर तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली. मागच्या तीन-चार वर्षांपासून पावसाचे कमी प्रमाण हे याचेच एक लक्षण असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माऊंटेन डेव्हलपमेंट अर्थात आयसीआयएमडीचे संचालक डेव्हिड मोल्डन यावेळी म्हणाले की, आपल्या सर्वांना या भागात विकासाच्या मॉडेलमध्ये सुधारणा करण्याची गरज असून त्यासाठी वेगळी रणनीती बनवावी लागणार आहे. तसेच यासाठी नवीन संशोधन करावे लागणार असून त्यासाठी सर्वांनाच परिश्रम घेऊन पर्वतीय भागातील या देशांच्या समस्या सोडवण्यासाठी जागतिक स्तरावर काम करावे लागणार आहे.
दरम्यान, यावेळी आयसीआयएमडीचे एक तज्ज्ञ गुलाम रसूल यांनीही, भारत, चीन, नेपाळ आणि बांगलादेश या देशांमध्ये जगातील एक तृतीयांश लोकसंख्या आहे. त्यामुळे आता ज्या प्रमाणात परिस्थिती आहे त्याचा विचार करता या देशांमध्ये भविष्यात अन्नधान्य व पाण्याचा मोठा तुटवडा भासणार असून येथील लोकांना भविष्यात पोट भरण्यासाठी झगडावे लागणार असल्याचे सांगितले. या मुद्यावर आजपासूनच गंभीरपणे विचार केला नाही तर भविष्यात याचे गंभीर परीणाम भोगावे लागण्याची तयारी ठेवावी लागणार असल्याचेही रसूल म्हणाले.
येणारा काळ हा हिमालय परिसरातील सर्वच देशांना कठिण राहणार असून पर्यावरणाशी निगडीत असणारे भोजन, पाणी आणि ऊर्जा सारख्या सर्वच गोष्टींसाठी चिंतेचा विषय ठरणार आहे, असे कार्यक्रमात सहभागी सर्वच तज्ज्ञांनी सांगितले. जगातील ४० टक्के गरीब लोक याच देशांमध्ये राहतात. जर ही भयावह परिस्थिती या देशांमध्ये आली तर मानवप्रजातीसाठी हा सर्वात कठिण काळ ठरेल, असेही भाकित या तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28678

Posted by on Jun 21 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (207 of 2453 articles)


=आ. अंबरीश यांचा राजीनामा= बंगळुरू, [२० जून] - कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रविवारी १४ मंत्र्यांना डच्चू देत आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार ...

×