Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » भारताशिवाय जगाला जोडणे अशक्य

भारताशिवाय जगाला जोडणे अशक्य

=मार्क झुकेरबर्ग यांची भूमिका=
Mark Zuckerberg, founder and CEO of Facebook, and wife Priscilla Chan arrive on the red carpet during the 2nd annual Breakthrough Prize Award in Mountain View, Californiaनवी दिल्ली, [२८ ऑक्टोबर] – भारताशिवाय इंटरनेटच्या माध्यमातून संपूर्ण जगाला एकत्र जोडणे कदापि शक्य नाही, अशी ठाम भूमिका फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी आज बुधवारी येथे विशद केली.
आयआयटी दिल्लीच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना ते म्हणाले की, संपूर्ण जगाला जोडण्यासाठी आधी भारतातील नागरिकांना इंटरनेटशी जोडणे महत्त्वाचे आहे. कारण, जगाच्या पाठीवर भारत हा असा देश आहे, ज्याला इंटरनेटशी पूर्णपणे जोडल्याशिवाय जगाला जोडणे अशक्य आहे.
आज भारतात येऊन मी अतिशय उत्साहित आहे. येथे सर्वत्र मला उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. प्रत्येकामध्ये वेगळीच ऊर्जा दिसत आहे, असे सांगताना त्यांनी विद्यार्थ्यांना अतिशय मोलाचा सल्लाही दिला. तुम्ही काय करीत आहात, हा महत्त्वाचा मुद्दा नाही. तुम्ही असंख्य चुका केल्या असतील. अनुभवातून तुम्ही शिकला आणि चुकाही केल्या. त्यामुळे निराश न होता, समोर जा, मार्ग नक्कीच निघेल, असे त्यांनी सांगितले.
नेट न्युट्रॅलिटी एक चांगले तत्त्व आहे. आम्ही त्यासाठी खूप काही करीत आहोत. त्याचप्रमाणे, फेसबुकसाठीही आम्ही सातत्याने पुढचा विचार करीत आहोत. शक्य असलेल्या सर्व चुका मी केल्या आहेत. चुका होणारच, त्यामुळे चुका टाळण्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. तर, काहीतरी चांगले करा, ज्यातून तुमच्या चुकांनाही शक्ती मिळेल. कायम चुका करीत राहा आणि त्यातून शिकत राहा, असा सल्लाही त्यांनी दिला.
भारतात फेसुबक आणि व्हॉट्‌स ऍपचे असंख्य युजर्स आहेत. ते आमच्या समुदायाचा एक भाग आहेत. त्यामुळे आम्हाला ज्या लोकांना कनेक्ट करायचे आहे, त्याचाच हे युजर्स एक भाग आहेत. भारतात अजूनही अनेकजण इंटरनेटपासून दूर आहेत. कॅण्डी क्रॅशवरून येणारी विनंती थांबविण्यासाठी मी आमच्या डेव्हलपर्सना सांगितले आहे. ते त्यांचे काम करीत आहेत. सध्या मी येथे प्रश्‍नोत्तराचे काम करीत आहे, असे सांगताना ते म्हणाले की, फेसबुक कृत्रिम बुद्धीमत्तेवर मोठी गुंतवणूक करीत आहे. भविष्यात ती खूप उपयोगी ठरेल. अंध व्यक्तीला एखादे चित्र समजावून सांगण्यासारख्या अनेक बाबींसाठी हे तंत्र उपयुक्त ठरेल, असा मला विश्‍वास आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25385

Posted by on Oct 29 2015. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (1261 of 2453 articles)


लंडन, [२८ ऑक्टोबर] - प्रचंड औद्योगिकीकरण, अफाट वृक्षतोड, कार्बन उत्सर्जन, नागरीकरण, खनिज उत्खनन या व अन्य कारणांमुळे ग्लोबल वॉर्मिंग अर्थात ...

×