Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » भारताशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणार

भारताशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणार

=नवाज शरीफ यांची भूमिका=
Nawaz-sharifइस्लामाबाद, [२७ जानेवारी] – भारत आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या मैत्री संबंधाची पाकिस्तानने चांगलीच धास्ती घेतली आहे. भारतासोबत मैत्रिपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी व्यक्त केली आहे.
६६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या संदेशात ते म्हणाले की, दोन्ही देश विकासाच्या मुद्यावर एकत्र काम करू शकतात आणि हेच दोन्ही देशातील नागरिकांसाठी फायद्याचे आहे. दक्षिण आशियाच्या दृष्टीने शांतता आणि विकास या संयुक्त मुद्यावर एकत्र येण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली.
पाकिस्तान व भारताने एकमेकांना आदराची वागणूक द्यावी, सोबतच भारतासोबत समान मुद्यांवर मैत्रिपूर्ण संबंध स्थापन करण्याची आमची मनापासून इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. पाकिस्तानी सरकार आणि नागरिकांच्या वतीने भारतातील जनतेला ६६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांनी शुभेच्छा दिल्या.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20086

Posted by on Jan 28 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (2174 of 2458 articles)


पुणे, [२६ जानेवारी] - ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचे आज (सोमवार) वृद्धापकाळाने निधन झाले. पुण्यातील दिनानाथ रुग्णालयात त्यांनी अखेरचा ...

×