Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » भारताशी लढून काश्मीर जिंकू शकत नाही

भारताशी लढून काश्मीर जिंकू शकत नाही

=पाकच्या माजी परराष्ट्र मंत्री हीना रब्बानी यांचे वक्तव्य=
hina-rabbaniइस्लामाबाद, [२७ जून] – भारताशी लढून पाकिस्तान कधीही काश्मीर जिंकू शकणार नाही, असे महत्त्वपूर्ण वक्तव्य पाकच्या माजी परराष्ट्र मंत्री हीना रब्बानी यांनी येथे केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
भारताशी विश्‍वासार्ह चर्चा करूनच काश्मीर प्रश्‍नावर पुढे जाता येऊ शकेल, असेही त्या पुढे म्हणाल्या. स्थानिक जिओ न्यूज या वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात त्या बोलत होत्या. काश्मीरप्रश्‍नी चर्चा करूनच आम्ही ती समस्या सोडवू शकतो, असे सांगून त्या पुढे म्हणाल्या की, लढाई करून जर आपण काश्मीरवर विजय मिळवू शकत नसू तर आपल्याजवळ चर्चा हा एकच पर्याय उरतो.
पाकिस्तान पीपल्स पार्टी जेव्हा सत्तेवर होती तेव्हा त्या पक्षाने भारतासोबत संबंध सामान्य करण्याचा प्रयत्न केला होता. २०११ ते २०१३ या काळात आपण परराष्ट्र मंत्री असताना वास्तविक तेव्हा आमचे आघाडीचे सरकार होते तरी आम्ही विजा नियमात सूट दिली होती आणि व्यापारिक संबंधांना पुढे नेले होते, याचीही आठवण त्यांनी यावेळी करून दिली.
पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणात लष्कराच्या हस्तक्षेपाबद्दल विचारलेल्या प्रश्‍नावर त्या म्हणाल्या नी, परराष्ट्र धोरण राजनयिक पातळीवरचा मुद्दा आहे आणि त्यालाच पुढे नेले पाहिजे. जेथे गरज आहे तेथेच लष्कराने आपली भूमिका पार पाडली पाहिजे, असे सांगत जनरल मुशर्रफ यांनी आपल्या कार्यकाळात भारताला काश्मीरप्रकरणी बरीच सूट दिली होती, असेही यावेळी खार म्हणाल्या.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28977

Posted by on Jun 28 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (171 of 2458 articles)


=एकनाथ खडसेंवरील आरोप= जळगाव, [२७ जून] - अंजली दमानिया यांनी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर केलेल्या बेछूट व तथ्यहीन आरोपांच्या ...

×