भारतासोबतचे संबंध तणावाचेच
Monday, March 9th, 2015=सीमावादावर तोडगा इतका सोपा नाही : चीनची प्रतिक्रिया=
बीजिंग, [८ मार्च] – भारत आणि चीन या दोन देशांमधील सीमावादाचा प्रश्न अद्यापही ताणलेलाच असून, यावरील तोडगा इतका सोपा नाही. दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय संबंध स्थापन करण्यासाठी सहकार्याची आवश्यकता आहे, असे मत चीनने व्यक्त केले आहे.
नॅशनल पीपल्स कॉंग्रेसच्या (एनपीसी) वार्षिक पत्रपरिषदेत संसद सदस्यांना संबोधित करताना परराष्ट्र व्यवहार मंत्री वांग यी म्हणाले की, या वर्षी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला भेट देणार आहेत. त्यांचे योग्य आदरातिथ्य केले जाईल. सप्टेंबर २०१४ मध्ये चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी भारताला भेट दिली होती. त्यांच्या या दौर्यात नरेंद्र मोदी आणि जिनपिंग यांचे चरख्यावर काम करीत असतानाच्या चित्राला चीनमध्ये प्रचंड प्रसिद्धी मिळाली. भारत-चीन संबंधावर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते.
भारत-चीन सीमाप्रश्न फार जुना आहे. यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न बर्याच वर्षांपासून सुरू आहे आणि यासंदर्भात प्रगतीही झाली आहे. पण, दोन्ही देशांमधील संबंध अद्यापही ताणलेलेच आहेत. चर्चेच्या माध्यमातून फारच थोडी प्रगती झाली आहे. दोन देशात ठोस आणि सहकार्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी सीमावाद सोडविणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
Short URL: https://vrittabharati.in/?p=21195

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!