Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » भारतासोबतच पाकलाही मिळावे सदस्यत्व

भारतासोबतच पाकलाही मिळावे सदस्यत्व

=पाकिस्तानसाठी चीनचा असाही आटापिटा=
Pak-China-flagsबीजिंग, [२१ जून] – अणुपुरवठादार देशांच्या गटात (एनएसजी) भारताला सदस्यत्व मिळायला नको, यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असलेल्या चीनने आता नवी भूमिका घेतली आहे. भारताला जर या गटाचे सदस्यत्व मिळाले, तर त्याच निकषांवर पाकिस्तानलाही सदस्यत्व मिळावे, यासाठी चीनने आटापिटा सुरू केला आहे.
पाक हा अण्वस्त्रांचा शांततेसाठीच वापर करणारा देश आहे, असा दावाही चीनमधील शासकीय प्रसारमाध्यमांनी केला आहे. पाककडून काही देशांना अण्वस्त्र तंत्रज्ञानाचे हस्तांतरण झाले होते, पण त्यासाठी पाकी अण्वस्त्रांचा जनक अब्दुल कादिर खान जबाबदार होते व पाकने त्यांना सेवेतून बडतर्फ केले होते, असेही प्रसारमाध्यमांच्या वृत्तात म्हटले आहे.
चीनमधील सत्तारूढ कम्युनिस्ट पार्टीचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्स या वृत्तपत्राने एनएसजीमध्ये पाकचा समावेश करण्याचे आज मंगळवारच्या अंकात जोरदार समर्थन केले आहे. एनएसजीचे सदस्यत्व प्राप्त करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे; मात्र त्याचवेळी पाकला प्रवेश मिळायला नको, यासाठीही भारताचे प्रयत्न सुरू आहेत. अणू तंत्रज्ञानाच्या प्रसारासंदर्भात पाकची कामगिरी खराब असल्याचे भारताकडून सांगण्यात येत आहे. मात्र या तंत्रज्ञानाचा प्रसार अब्दुल कादीर खान यांनी केला होता, असा युक्तिवाद या वृत्तपत्रातील एका लेखात करण्यात आला.
भारताला जर एनएसजीमध्ये प्रवेश मिळत असेल, तर त्याच निकषांंवर पाकचाही विचार व्हायलाच हवा. पाकला डावलून भारताला प्रवेश देण्यास चीन व इतर काही देशांचा विरोध आहे. कारण यामुळे केवळ भारताच्या समस्येचे निराकरण होईल. मात्र त्यापेक्षाही मोठी समस्या उभी राहील. तेव्हा भारताने पाकसाठीही प्रयत्न करणे योग्य ठरेल, असे या लेखात म्हटले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28691

Posted by on Jun 22 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (208 of 2458 articles)


=केंद्राचा नवा पुढाकार, सर्व राज्यांना निर्देश= नवी दिल्ली, [२१ जून] - शालेय विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार्‍या जात आणि रहिवासी प्रमाणपत्राला ...

×