Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » भारतीयांच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित करणार : स्वराज

भारतीयांच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित करणार : स्वराज

=सुषमा स्वराज इराण, रशिया दौर्‍यावर रवाना=
Sushma-Swaraj3नवी दिल्ली, [१६ एप्रिल] – आपल्या रशिया दौर्‍यात आगीच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दोन भारतीय विद्यार्थिनी आणि आणखी एका भारतीयाची झालेली हत्या, हे दोन्ही विषय तेथील सरकारकडे उपस्थित करणार आहे, असे परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी शनिवारी सांगितले.
सुषमा स्वराज इराण आणि रशिया या दोन देशांच्या दौर्‍यावर रवाना झाल्या. स्वराज उद्या रविवारी तेहरान येथून मॉस्कोला जाणार असून, त्याठिकाणी होणार्‍या आरआयसीच्या (रशिया, भारत व चीन) परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होणार आहेत.
‘मी मॉस्कोला जात आहे. आगीच्या दुर्घटनेत पूजा कल्लूर व करिष्मा भोसले या भारतीय विद्यार्थिनींच्या मृत्यू प्रकरणाचा अंतिम अहवाल हा माझ्या अजेंड्यावर आहे. याशिवाय कझान येथे श्रीनगरमधील यासीर या आणखी एका भारतीयाच्या झालेल्या मृत्यूचा मुद्दाही उपस्थित करणार आहे,’ असे स्वराज यांनी केलेल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.
आरआयसीच्या बैठकीत सहभागी होण्यासोबतच सुषमा स्वराज रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यात पश्‍चिम रशियाच्या स्मोलेन्स्क वैद्यकीय अकादमीत लागलेल्या भीषण आगीत दोन भारतीय विद्यार्थिनींचा होरपळून मृत्यू झाला होता. शिवाय गेल्या महिन्यात अज्ञात हल्लेखोरांनी काश्मिरी व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या केली होती.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27827

Posted by on Apr 17 2016. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (491 of 2453 articles)


अहमदाबाद, [१६ एप्रिल] - वरिष्ठ आयपीएस अधिकारी पी. पी. पांडे यांनी आज शनिवारी गुजरातचे प्रभारी पोलिस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला. ...

×