Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » भारतीय अर्धा दिवस व्हॉट्‌स ऍपवर घालवतात!

भारतीय अर्धा दिवस व्हॉट्‌स ऍपवर घालवतात!

=भारतीयांची अशीही नशा, आंतरराष्ट्रीय अभ्यासातील निष्कर्ष=
whatsapp-mनवी दिल्ली, [२९ जून] – व्हॉट्‌स ऍप, वुई चॅट आणि स्कायपी व हाईक यासारख्या मेसेजिंग ऍपचा वापर भारत, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये सर्वाधिक होत असून, अशा प्रकारची अत्याधुनिक सुविधा असलेले भारतीय नागरिक आपला अर्धा दिवस केवळ या मेसेजिंग ऍप्लिकेशन्सवरच वाया घालवत असल्याचे एका ताजा आंतरराष्ट्रीय अभ्यासात दिसून आले आहे.
स्वीडनमधील दूरसंचार उपकरणे तयार करणार्‍या इरिक्सन कंपनीने हे सर्वेक्षण केले आहे. अत्याधुनिक मेसेजिंग ऍप्लिकेशन्सचा वापर करणार्‍या भारतीयांचा दिवसातील तब्बल ४७ टक्के वेळ केवळ व्हॉट्स ऍप, वुई चॅट, स्कायपी आणि हाईक यावरच जातो, असे या पाहणीत आढळून आले आहे. स्मार्टफोन्सवर संवादाची प्रक्रिया सतत सुरू असते. त्यामुळे कित्येकांच्या स्मार्टफोन्सवर हे ऍप्स कायम ऑन असतात. मोबाईल ब्रॉडबॅण्डचा सर्वाधिक वापर या ऍप्सच्या वापरासाठीच केला जातो.
या अभ्यासात भारतासोबतच अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया आणि ब्रिटन या देशातील ऍण्ड्रॉईड वापरणार्‍या लोकांचे मत विचारात घेण्यात आले. भारतातील ७,५०० ऍण्ड्रॉईड धारकांचा अभ्यासात समावेश आहे. भारतीय लोक आपल्या दिवसातील वेळेच्या ४७ टक्के वेळ स्मार्टफोन्सवर व्हॉईस, इन्स्टंट मेसेजिंग, स्कायपी, ई-मेल्स व सोशल नेटवर्किंगचा वापर करण्यात घालवतात. कम्युनिकेशन ऍप्सला सतत सुरू ठेवण्यासाठी मोबाईल ब्रॉडबॅण्डवर अवलंबून राहावे लागते, असेही अभ्यासात म्हटले आहे.
या अभ्यासानुसार अमेरिका, ब्रिटन आणि भारतातील लोक स्मार्टफोन्सवर ३० टक्क्यांपेक्षा जास्त वेळ कम्युनिकेशन ऍप्ससाठी वापरतात. स्मार्टफोन्सवरील एकूण डेटाच्या वापरापैकी ब्रॉडबॅण्ड इंटरनेटचा ४०-५० टक्के वापर कम्युनिकेशन ऍप्ससाठी, तर केवळ २० टक्के व्हिडीओसाठी केला जातो, असे एरिक्सन कन्झ्युमर लॅबच्या वरिष्ठ सल्लागार स्वीटलीना स्वेन यांनी म्हटले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23126

Posted by on Jun 30 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1597 of 2453 articles)


=नवीन नियमांना आयसीसीची मान्यता= बार्बाडोस, [२७ जून] - आयसीसी क्रिकेट समितीच्या शिफारशीनुमार गोलंदाजांचे हितजोपाचताना आता एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या खेळांच्या ...

×