Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » भारतीय तरुणांना अमेरिकेतच राहण्याचे आवाहन

भारतीय तरुणांना अमेरिकेतच राहण्याचे आवाहन

donald_trumpवॉशिंग्टन, [१५ मार्च] – अमेरिकेतील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणार्‍या भारतीय युवकांना देशाबाहेर घालवू नका, कारण अमेरिकेला या स्मार्ट युवकांची खर्‍या अर्थाने गरज आहे, असे मत डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले. देशाचे स्थलांतरण (इमिग्रेशन) धोरण ठरविताना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे आघाडीचे दावेदार ट्रम्प यांनी हे मत मांडले.
भारतीय विद्यार्थी बक्कळ पैसे मोजून शिक्षणासाठी अमेरिकेत येतात. त्यापैकी अनेकजण थेट हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश मिळवितात. इतकेच नव्हे, तर तिथे ते पहिला क्रमांक देखील पटकावतात. पण त्यानंतर ते पुन्हा भारतात जातात आणि तिथे जाऊन आपला व्यवसाय सुरू करतात आणि कित्येक भारतीयांकरिता रोजगार निर्माण करतात. हे भारतीय स्मार्ट युवक खरोखरीच हुशार आहेत, त्यामुळे त्यांनी भारतात परत न जाता अमेरिकेतच स्थायिक झाले पाहिजे, असे ट्रम्प म्हणाले.
सध्याच्या स्थलांतरण धोरणानुसार, अमेरिकेत बरीच वर्षे राहून शिक्षण घेतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना पदवी मिळाल्यावर अमेरिका पुन्हा मायदेशी परत पाठवून देते. मात्र, आपण ही चूक करीत आहोत. अनेक भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेतच स्थायिक व्हायचे असते, परंतु त्यांच्या एच-१बी व्हिसाची मुदत आणि अटीनुसार त्यांना इच्छा नसतानाही भारतात परतावे लागते. हीच बाब लक्षात घेऊन एच-१बी व्हिसा कार्यक्रम रद्द करण्याविषयी ट्रम्प सुरुवातीपासूनच प्रयत्नशील होते.
अमेरिकेत सध्या वैध दस्तावेज नसलेले अंदाजे ११ दशलक्ष स्थलांतरित आहेत. भारतातील बहुसंख्य आयटी व्यावसायिक आणि मोठ्या आयटी कंपन्या अमेरिकेच्या एच-१बी व्हिसाच्या लाभधारक आहेत. कायमच्या स्थलांतरणास प्रतिबंध घालणार्‍या या व्हिसाधारकांना अमेरिकन व्यावसायिक कायद्यानुसार विशेष कामांकरिता काही काळासाठी नोकरी देखील देऊ शकतात.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27354

Posted by on Mar 16 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (651 of 2458 articles)


=भुजबळांची अशीही लबाडी, ईडीच्या चौकशीतून समोर आली माहिती= मुंबई, [१५ मार्च] - राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या नूतनीकरणात आणि अन्य प्रकल्पांच्या ...

×