Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » भारतीय दंड विधानाचा फेरआढावा घेण्याची गरज : राष्ट्रपती

भारतीय दंड विधानाचा फेरआढावा घेण्याची गरज : राष्ट्रपती

pranab-mukherjee_290कोच्ची, [२७ फेब्रुवारी] – भारतीय दंड विधानातील देशद्रोहाचे कलम रद्द करण्यात यावे, या मागणीने जोर धरला असतानाच २१ व्या शतकातील बदलत्या काळाची गरज लक्षात घेता याचा फेरआढावा घेण्याची गरज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केली आहे.
भारतीय दंड विधान लागू होण्याला १५५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त डायरेक्टरेट ऑफ प्रॉसिक्युशनने येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रपती मुखर्जी यांनी हे मत व्यक्त केले. १ जानेवारी १८६२ पासून देशात भारतीय दंड विधान लागू आहे.
यासंबंधीच्या कायद्याचा विचार करता भादंवि हे आदर्श कलम आहे, याबाबत कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. परंतु, २१ व्या शतकातील बदलती परिस्थिती लक्षात घेता याचा फेरआढावा घेण्याची गरज आहे, असे राष्ट्रपती मुखर्जी म्हणाले. गेल्या १५५ वर्षांच्या कालखंडात भादंविमध्ये फारच किरकोळ बदल झाले. गुन्ह्यांच्या प्रारंभिक यादीत फारच कमी गुन्ह्यांचा नव्याने समावेश करण्यात आला किंवा त्यांना दंडनीय घोषित करण्यात आले. ब्रिटिशांनी आपल्या गरजेनुसार यामध्ये समाविष्ट केलेली काही कलमे अजूनही तशीच कायम आहेत, याकडे लक्ष वेधतानाच, आता असे अनेक नवे गुन्हे आहेत ज्यांची योग्य परिभाषा करून त्यांचा भादंविमध्ये समावेश झाला पाहिजे, असे राष्ट्रपती म्हणाले.
गुन्हेगारांना शिक्षा करणे आणि गुन्ह्यांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी फौजदारी कायदा आवश्यक आहे. परंतु, सामाजिक रचना आणि तत्त्वज्ञान लक्षात घेता यामध्ये आवश्यक ते बदल करण्यासाठी तो कायदा तेवढाच संवेदनशील असणे आवश्यक आहे. त्यामध्ये समकालीन सामाजिक जाणीवेचे प्रतिबिंब उमटावे आणि तो संस्कृतीचा विश्‍वासू आरसा असला पाहिजे, जेणेकरून मूलभूत मूल्यांची जाणीव होईल, असेही मुखर्जी म्हणाले.
कायद्याचे राज्य या मुख्य तत्त्वाच्या आधारेच कोणताही आधुनिक देश पुढे जाऊ शकतो आणि ते अखेरपर्यंत कायम ठेवलेच पाहिजे. पोलिस विभागाने कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याचे आपले कर्तव्य प्रामाणिकपणे व निष्ठेने बजावले पाहिजे. पोलिसांची प्रतिमा त्यांच्या कृत्यावर आधारित असते. त्यांनी तत्काळ, समानता आणि निष्पक्षपणे कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे, असेही मत मुखर्जी यांनी व्यक्त केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26911

Posted by on Feb 28 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (806 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२७ फेब्रुवारी] - मध्य प्रदेश विधानसभा भरती गैरव्यवहार प्रकरणी कॉंग्रेसचे महासचिव दिग्विजयसिंह यांच्या अटकेचे आदेश निघाले होते. त्यानंतर ...

×