Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » भारतीय मासेमारांना गोळ्या घालण्याची भाषा!

भारतीय मासेमारांना गोळ्या घालण्याची भाषा!

=श्रीलंकन पंतप्रधानांचे धक्कादायक वक्तव्य=
Ranil Wickramasingheकोलंबो, [७ मार्च] – भारतीय मासेमार जर सागरी हद्दीचे उल्लंघन करून आमच्या समुद्रात मासेमारी करीत असतील, तर त्यांना गोळ्या घालून ठार मारण्यात येईल, असे वादग्रस्त आणि धक्कादायक वक्तव्य श्रीलंकेचे पंतप्रधान रानील विक्रमसिंघे यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १३ मार्च रोजी श्रीलंका दौर्‍यावर जाणार असतानाच त्यांच्या या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
‘‘भारतीय मासेमार आमच्या हद्दीत येतात आणि उत्तरेकडील श्रीलंकन मासेमारांच्या उपजीविकेचे साधन चोरून नेतात. माझ्या घरात घुसून जर कुणी चोरी करीत असेल, तर मी त्याला ठार मारेन. कायदाही आपल्याला तशी परवानगी देतो,’’ असे विक्रमसिंघे यांनी तामीळ टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. विशेष म्हणजे, परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज सध्या श्रीलंका दौर्‍यावरच असून, त्यांनी या वक्तव्यावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
या मुलाखतीत श्रीलंकन पंतप्रधानांनी म्हटले आहे की, ज्या पाण्यावर आमचा हक्क आहे, तिथे मासेमारी करण्याचा अधिकार केवळ श्रीलंकन मासेमारांनाच आहे. जाफनाच्या मासेमारांना तिथे मासेमारीची परवानगी मिळायला हवी. पण, आम्ही त्यांना तूर्तास रोखून धरले आहे. याचाच फायदा घेऊन भारतीय मासेमार सागरी हद्दीचे उल्लंघन करतात आणि आमच्या मासेमारांच्या उपजीविका हिरावून नेतात. त्यामुळे अशा भारतीय मासेमारांना गोळ्या घालण्यात काहीच गैर नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या श्रीलंकन दौर्‍याचा कार्यक्रम आणि दोन्ही देशांमध्ये होऊ घातलेल्या करारांचा आराखडा तयार करण्यासाठी स्वराज श्रीलंकेतील वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेत आहेत. शुक्रवारी त्यांनी राष्ट्राध्यक्ष मैत्रिपाला सिरिसेना यांची भेट घेतली.
चर्चेतून तोडगा काढा : सुषमा स्वराज यांची सूचना
सागरी सीमेचे उल्लंघन करणार्‍या भारतीय मासेमारांना गोळ्या घालू, असा इशारा श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी दिल्यानंतर सध्या त्या देशाच्या भेटीवर असलेल्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. सुषमा स्वराज यांनी विक्रमसिंघे यांची भेट घेतली आणि चर्चेच्या माध्यमातून अनेक मुद्दे सोडविले जाऊ शकतात, अशी भूमिका विशद केली.
भारतीय मासेमारांच्या सागरी घुसखोरीची तुलना तुम्ही इटालियन सुरक्षा रक्षकांनी जे केले, त्याच्याशी करू नका. या दोन्ही घटना वेगवेगळ्या आहेत. गोळीने कोणतीही समस्या सुटणार नाही. चर्चेच्या माध्यमातूनच सर्व मुद्यांवर तोडगा काढला जाऊ शकतो, असे त्यांनी या बैठकीत स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21182

Posted by on Mar 8 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1962 of 2458 articles)


=मयंक गांधी यांचा आरोप= नवी दिल्ली, [७ मार्च] - प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांच्यावरील कारवाई अन्यायकारक असल्याची टीका आपण ...

×