Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » भारतीय राजदूतांना हाकलून लावा

भारतीय राजदूतांना हाकलून लावा

=हाफिझचे मुस्लिम देशांना आवाहन, संयुक्त राष्ट्रसंघावरही आगपाखड=
Hafiz_Saeedइस्लामाबाद, [८ ऑगस्ट] – हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सलाउद्दिनने भारताला आण्विक युद्धाची धमकी दिली असतानाच २६/११ च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिझ सईदने संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस बान की मून यांच्यावर आगपाखड करतानाच जगातील मुस्लिम देशांनी भारतीय राजदूतांना परत पाठविण्याचे आवाहन केले आहे.
जम्मू-काश्मिरात सध्या जे काही सुरू आहे तो भारताचा अंतर्गत प्रश्‍न आहे, असे युनोचे सरचिटणीस बान की मून यांचे मत असेल, तर याचाच अर्थ त्यांनी भारताला पूर्ण मोकळीक दिली आहे. युनोने वाट्टेल ते करण्याचा अधिकार भारताला दिला आहे. म्हणूनच जगातील ६० मुस्लिम देशांच्या राज्यकर्त्यांनी युनोसारख्या संस्थांवर बहिष्कार टाकतानाच भारतीय राजदूतांना हाकलून लावावे, असे आवाहन हाफिझने केले आहे.
जगातील ६० मुस्लिम देशांनी भारतावर व्यापारविषयक बहिष्कार टाकावा, भारतीय कंपन्यांना हाकलून लावा आणि तुमच्या देशातील भारतीय राजदूतांना हाकलून लावतानाच भारतातील तुमच्या राजदूतांनाही माघारी बोलवा, अशा शब्दांत हाफिझने गरळ ओकली.
यावेळी हाफिझने पाकिस्तान सरकारलाही भडकावण्याचा प्रयत्न केला. तुम्ही भारताशी मैत्री, चर्चा करण्यात व्यस्त राहिले, तर यावर कोणताही तोडगा निघणार नाही. त्यामुळे पाक सरकारला काश्मिरींसोबत उभे राहावेच लागेल आणि जेव्हा तुम्ही साथ द्याल तेव्हा काश्मीर एका झटक्याची गोष्ट आहे आणि इंडिया तुमच्यासमोर हात पसरेल, अशी दर्पोक्तीही त्याने केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29174

Posted by on Aug 9 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (135 of 2458 articles)


=पंतप्रधानांचा इशारा= हैदराबाद, [८ ऑगस्ट] - कोणाला हल्ला करायचा असेल तर माझ्यावर करा, गोळी चालवायची असेल तर माझ्यावर चालवा, परंतु ...

×