Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » भारतीय हद्दीतून नेली पाककडे पाणबुडी

भारतीय हद्दीतून नेली पाककडे पाणबुडी

=चीनची खोडी=
china submarineनवी दिल्ली, [२७ जून] – एरवी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून भारतात घुसखोरी करणार्‍या चीनने आता मात्र चक्क भारतीय सागरी सुरक्षेलाच छेद देण्याचे धाडस केले आहे. भारतीय समुद्रातून चीनने आपली पाणबुडी चक्क पाकिस्तानच्या कराची बंदरापर्यंत नेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
गेल्या २२ मे रोजी चीनची युआन क्लास ३३५ ही पाणबुडी अरबी समुद्रातून भारतीय हद्द पार करीत कराचीत दाखल झाली होती, असे प्रसारमाध्यमांच्या वृत्तात म्हटले आहे. या पाणबुडीवर चीनच्या नौदलातील ६५ जण होते. कराची बंदरात रिफ्युलिंग आणि रिस्टॉकिंगची प्रक्रिया पूर्ण करून एक आठवड्यानंतर ही पाणबुडी पुन्हा चीनला रवाना झाली होती.
चीनच्या या खोडसाळ कृत्याच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय नौदलाने सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. अशा प्रकारे चीन निकट भविष्यात भारतीय सागरी सीमेला धोका निर्माण करण्याची शक्यता नौदलाने वर्तविली आहे. आम्ही चीन नौदलाच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहोत, अशी माहिती नौदलप्रमुख आर. के. धोवन यांनी यापूर्वीच दिली आहे. दरम्यान, सूत्राच्या मते, आगामी काही वर्षातच चीन पाकिस्तानला युआन क्लासमधील आठ पाणबुड्या विकणार आहे. याच व्यवहारानुसार ही पहिली पाणबुडी पाकच्या कराची बंदरापर्यंत पोहोचली होती. ही पाणबुडी टॉरपिडो, जहाजभेदी क्षेपणास्त्र आणि समुद्राच्या तळाशीदेखील शत्रूंवर आघात करण्याची क्षमता असलेल्या अन्य अत्याधुनिक अस्त्रांनी सज्ज आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23110

Posted by on Jun 28 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (1601 of 2453 articles)


=प्राथमिक शिक्षणाच्या प्रचारावर भर= बंगळुरू, [२७ जून] - नरेंद्र मोदी यांना शह देण्यासाठी कॉंग्रेस पक्षाकडून पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून नाव ...

×