भारत-अमेरिका ‘बेस्ट फ्रेंड’
Wednesday, September 23rd, 2015- जागतिक आव्हानांमुळे दोन्ही देश अतिशय जवळ आले
- उपराष्ट्राध्यक्ष बिदेन यांचे प्रतिपादन
वॉशिंग्टन, [२२ सप्टेंबर] – भारत आणि अमेरिका एकमेकांचे ‘बेस्ट फ्रेंड’ (अतिशय चांगले मित्र) आहेत. जागतिक आव्हानांमुळे या दोन्ही देशांना आजवर कधी नव्हे, इतके जवळ आणले आहे. त्यामुळे सहनशील नसलेल्या आणि हिंसक शक्तींना रोखण्यासाठी दोन्ही देशांनी प्रयत्न करतानाच जगातील या सर्वोच्च लोकशाही असलेले हे देश अधिक मजबूत कसे होतील, याकडेही लक्ष द्यायला हवे, असे प्रतिपादन अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जो बिदेन यांनी आज मंगळवारी केले.
अमेरिका-भारत व्यावसायिक परिषदेच्या ४० व्या वार्षिक बैठकीत बोलताना ते म्हणाले की, भारत व अमेरिकेतील संबंध कधी नव्हे, इतके घनिष्ठ झाले आहेत. दोन्ही देश आणि देशांचे नागरिक एकमेकांचे अतिशय चांगले मित्र आहेत. हिंसक शक्तींना रोखण्याची क्षमता दोन्ही देशांमध्ये असल्याने, त्यांनी या दिशेने प्रयत्न करायलाच हवेत. ही केवळ नैतिक जबाबदारी नसून, दोन्ही देशांची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठीही ती आवश्यक आहे.
विशेष म्हणजे, अवघ्या १०० दिवसांत बिदेन यांनी भारतासोबतच्या संबंधावर दिलेले हे दुसरे भाषण आहे. याच कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी भारत-अमेरिका धोरणात्मक व व्यावसायिक चर्चेलाही प्रारंभ केला.
भारत-अमेरिका यांच्यातील संबंधाच्या नव्या पर्वाला आता प्रारंभ झालेला आहे. जागतिक स्तरावर दोन्ही देशांना अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडायची आहे. दोन्ही देशांमध्ये ही क्षमता आहे. संपूर्ण जगाच्या आर्थिक विकासाचा विचार आपल्याला करायचा आहे. सोबतच, दहशतवादविरोधी लढ्यातही आपल्याला एकमेकांसोबत संयुक्तपणे उभे राहायचे आहे. हवामानातील बदलांमुळे संपूर्ण जगापुढेच गंभीर आव्हान उभे झाले आहे. हे आव्हानही आपल्याला संयुक्तपणे परतावून लावायचे आहे, असे बिदेन यांनी स्पष्ट केले.
Short URL: https://vrittabharati.in/?p=24001

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!