Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » भारत-अमेरिका व्यापार वाढविण्याचे लक्ष्य: जेटली

भारत-अमेरिका व्यापार वाढविण्याचे लक्ष्य: जेटली

arun-jaitley2नवी दिल्ली, [१४ सप्टेंबर] – भारताने संरक्षण क्षेत्रात परदेशी गुंतवणुकीला मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच ‘मेक इन इंडिया’मोहिमेअंतर्गत उत्पादनाचे कार्य सुरू होईल, अशी आशा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी येथे व्यक्त केली. येथे आयोजित ११ व्या इंडो-यूएस इकोनॉमिक समीटमध्ये ते बोलत होते.
मेक इन इंडिया मोहिमेला खूप पुढे न्यायचे असल्याने त्याचा एक भाग म्हणून भारत अमेरिकेसोबत द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगत लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचा दौरा करणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
भारतात सध्या काही आंतरिक बदल होणे गरजेचे आहे, असे म्हणत करविषयक कायद्यांमध्ये बदल आणि सुलभता आणण्यावर भर दिला असून, परंपरेनुसार चालत आलेली करप्रक्रिया अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न केला आहे. भारत लवकरच जगातील सर्वांत चांगली आणि विश्‍वसनीय कर आकारणी प्रणाली तयार करेल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि भारताचे पंतप्रधान मोदी दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार पुढे नेण्यासाठी कटिबद्ध आहेत. काही वर्षांतच दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज डॉलर्सवरून ५०० अब्ज डॉलर्सवर नेण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. अमेरिका अपारंपरिक ऊर्जा आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी भारतात मोठी गुंतवणूक करणार आहे. सध्या जागतिक बाजारात कच्चे तेल आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत घट झाल्याने भारताला स्रोतांची बचत करण्यात मोठी मदत झाली आहे, असे जेटली यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23798

Posted by on Sep 14 2015. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1475 of 2453 articles)


=आयोगाची माहिती= नवी दिल्ली, [१४ सप्टेंबर] - पुढील महिन्यापासून पाच टप्प्यात होत असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्वच ६२,७७९ मतदान ...

×