Home » उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य » भारत आर्थिक महासत्ता म्हणून पुढे येईल

भारत आर्थिक महासत्ता म्हणून पुढे येईल

=भाजपाच्या बैठकीत आर्थिक प्रस्तावातून विश्‍वास=
arun jaitley5अलाहाबाद, [१३ जून] – जागतिक मंदीच्या काळातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत आर्थिक महासत्ता म्हणून पुढे येईल, असा विश्‍वास भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आर्थिक प्रस्तावातून व्यक्त करण्यात आला,
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर रविवारी रात्री उशिरा दुसर्‍या सत्रात आर्थिक प्रस्ताव पारित करण्यात आला. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस भूपेंद्र यादव यांनी मांडलेल्या या प्रस्तावाचे वाणिज्यमंत्री निर्मला सीतारमन यांनी समर्थन केले. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे या प्रस्तावावर मुख्य भाषण झाले.
संपुआ सरकारच्या धोरणामुळे अर्थव्यवस्था रसातळाला गेली, बँका कर्जात बुडाल्या, असा आरोप या प्रस्तावातून करण्यात आला. २०११-१२ मध्ये सकल राष्ट्रीय उत्पादनाचा विकास दर ५.६ टक्क्यांवर आला, औद्योगिक विकास दर २.९ टक्क्यांवर पोचला, परकीय गंगाजळी कमी झाली, याकडे लक्ष वेधत प्रस्तावात म्हटले की, मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर १ कोटी १५ लाख रुपयांच्या प्रलंबित प्रस्तावांना सरकारने हिरवी झेंडी दाखवली, विदेशी गुंतवणुकीला चालना मिळाली. ती ४१ अब्ज डॉलर्सवरून ५५अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली. परकीय गंगाजळीत ३६० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढ झाली. भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शी प्रशासनामुळे गुंतवणूकदारांचा विश्‍वास वाढला, असेही यात नमूद आहे.
देशात सलग दोन वर्षे दुष्काळाची स्थिती असतानाही विकास दर ७.९ टक्क्यांवर गेला, आर्थिक तूट ४.९ टक्क्यांवरून ३.९ टक्क्यांवर आली, यावर्षी तर ती ३.५ टक्केच राहील, असे या प्रस्तावात म्हटले आहे.
जीएसटीसारखे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणारे विधेयक रोखण्याच्या कॉंग्रेसच्या भूमिकेवर जोरदार हल्ला चढवण्यात आला. जीएसटी पारित झाले तर देशाच्या अर्थव्यवस्थेत गुणात्मक परिवर्तन येईल, असा विश्‍वास व्यक्त करत पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या अंत्योदयाच्या धोरणानुसार ‘सबका साथ सबका विकास’ हे धोरण प्रत्यक्षात आणण्याचा निर्धारही या प्रस्तावातून व्यक्त करण्यात आला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28571

Posted by on Jun 13 2016. Filed under उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य (245 of 2452 articles)


अलाहाबाद, [१३ जून] - अलाहाबाद येथे सुरू असलेल्या भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आगामी उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची घोषणा होणार ...

×