Home » ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य » भारत का दिल चुहे का है: रशीद

भारत का दिल चुहे का है: रशीद

  • अब्दुल रशीदकडून अपमान
  • पाकिस्तानी रेडिओवरून केले वक्तव्य

J&K MLA Sheikh Abdul Rashidनवी दिल्ली, [२१ ऑक्टोबर] – जम्मू-काश्मिरात गोमांस बंदीवरून वादळ उठले असताना, ‘बीफ पार्टी’चे आयोजन करणारा राज्य विधानसभेचा अपक्ष आमदार शेख अब्दुल रशीदने भारताचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चक्क पाकिस्तानी रेडिओवरून घोर अपमान केला आहे. ‘भारत का दिल चुहे का है’ असे वादग्रस्त वक्तव्य त्याने केले आहे.
रशीद याने श्रीनगरात बीफ पार्टीचे आयोजन केल्यानंतर विधानभवनात त्याला मारहाण करण्यात आली होती. अलीकडेच तो राजधानी दिल्लीत आला असताना, त्याच्या तोंडाला काळी शाईदेखील फासण्यात आली होती. त्याने आपल्या या अपमानाचे खापर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर फोडले आहेत. या देशात जो सत्य बोलतो, अन्यायाविरोधात आवाज उठवतो, त्या अल्पसंख्यकांना मोदी सरकारमधील लोक पाकिस्तानी एजंट संबोधतात. नरेंद्र मोदी यांना आपले काळे तोंड दाखविण्यासाठी मी तीन तास प्रतीक्षा केली. पण, मला भेट नाकारण्यात आली. मोदी सरकारच्या या व्यवहारामुळे देशाला बाह्य नव्हे, तर अंतर्गत लोकांपासूनच धोका वाढला आहे, असेही त्याने सांगून टाकले.
भारताचा आकार विशाल आहे, पण मन मात्र उंदरासारखे आहे, असे रशीदने सांगितले. भारत हा कोणत्या एका समाजाचा देश नाही, तर सर्वच धर्मातील लोकांचा आहे. या देशात लोकशाही आहे, असेही तो म्हणाला. विशेष म्हणजे, रशीदने यापूर्वी संसदेवरील हल्ल्याचा एक सूत्रधार अफझल गुरूच्या फाशीवरूनही वादग्रस्त वक्तव्य केले होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25248

Posted by on Oct 22 2015. Filed under ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य (1302 of 2452 articles)


=पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार= अमरावती, [२१ ऑक्टोबर] - आंध्रप्रदेशची नवी राजधानी म्हणून गुंटूर जिल्ह्यातील अमरावतीची निवड करण्यात आल्यानंतर नव्या राजधानीचा ...

×