Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » भारत-चीन संबंध नव्या उंचीवर : जिनपिंग

भारत-चीन संबंध नव्या उंचीवर : जिनपिंग

=राजशिष्टाचार बाजूला सारून घेतली स्वराज यांची भेट=
sushma swaraj-xijinping-chinaबीजिंग, [२ फेब्रुवारी] – द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी भारत-चीन यांनी अतिशय ठोस पावले उचलली आहेत, तसेच भारत दौर्‍यात झालेल्या करारांचीही प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे, असे उद्‌गार चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी येथे काढले. जिनपिंग यांनी राजशिष्टाचार बाजूला सारून सोमवारी चीनच्या दौर्‍यावर असलेल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली आणि द्विपक्षीय तसेच आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा केली. स्वराज यांनीही त्यांच्या मताला दुजोरा दिला.
भारत-चीन संबंधावर माझा पूर्ण विश्‍वास आहे. या नव्या वर्षात उभय देश प्रगतीच्या नव्या उंचीवर पोहोचलेले असतील, असे जिनपिंग यांनी सुषमा स्वराज यांच्यासोबतच्या चर्चेत सांगितले. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सुषमा स्वराज प्रथमच चीनच्या चार दिवसांच्या भेटीवर आलेल्या आहेत. त्यांची भेट घेण्याकरिता जिनपिंग यांनी राजशिष्टाचार बाजूला सारला आणि ग्रेट हॉलमध्ये त्यांची भेट घेतली.
यावेळी जिनपिंग म्हणाले की, गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मी भारत भेटीवर आलो होतो. तेव्हापासूनच दोन्ही देशांच्या संबंधात मैत्रीचे नवे पर्व सुरू झाले आहे. सहकार्यही सातत्याने वृद्धिंगत होत आहे. पंतप्रधान मोदी आणि माझ्यात जे काही करार झाले होते, त्यांची योग्य आणि प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.
स्वराज-सर्गेई भेट
तत्पूर्वी, सुषमा स्वराज यांनी रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांची भेट घेतली. यावेळी भारताचे नवनियुक्त परराष्ट्र सचिव एस. जयशंकर हेदेखील उपस्थित होते.
सुमारे एक तास झालेल्या या चर्चेत भारत व रशियातील मैत्री अधिक विकसित करण्यावर विशेष भर देण्यात आला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्या गेल्या वर्षीच्या भारत भेटीदरम्यान प्रकाशित करण्यात आलेल्या द्रुझबा-दोस्ती या व्हीजन डॉक्युमेंट्‌सवर त्यांच्यात चर्चा झाली. भारत व रशियातील संबंध पुढील दशकात अधिक बळकट करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट या डॉक्युमेंट्‌समध्ये निर्धारित करण्यात आले आहे.
दहशतवाद्यांना धडा शिकवाच : त्रिपक्षीय परिषदेतील सूर
अतिरेकी कारवाया आणि दहशतवाद्यांना प्रोत्साहन देणार्‍यांना योग्य धडा शिकवायला हवा, असा एकमुखी सूर रशिया, भारत आणि चीनच्या १३ व्या त्रिपक्षीय परिषदेत काढण्यात आला. जागतिक दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी भारताचा ठराव शक्य तितक्या लवकर मंजूर करण्यावरही या परिषदेत भर देण्यात आला.
प्रादेशिक संपर्कासह त्रिपक्षीय सहकार्याचे संबंध वाढविण्यावरही या देशांमध्ये एकमत झाले. परिषदेत भारताचे नेतृत्व सुषमा स्वराज यांनी, तर चीनचे नेतृत्व परराष्ट्र मंत्री वांग यी आणि रशियाचे नेतृत्व सर्गेई लाव्हरोव्ह यांनी केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20251

Posted by on Feb 3 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (2135 of 2458 articles)


=एसआयटी चौकशीला स्थगिती नाही= नवी दिल्ली, [२ फेब्रुवारी] - महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना, आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करून बेकायदेशीरपणे ठेके ...

×