Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » भारत-चीन सीमेवर स्त्रीशक्ती

भारत-चीन सीमेवर स्त्रीशक्ती

=प्रथमच महिला जवानांची तुकडी तैनात=
Indian Army, women soldiersनवी दिल्ली, [२४ मे] – विविध क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून यशस्वी काम करणार्‍या महिला आता चक्क देशाच्या शत्रूंपासूनच सीमेचे रक्षणही करणार आहेत. अतिशय संवेदनशील समजल्या जाणार्‍या भारत-चीन सीमेवर भारत-तिबेट सीमा पोलिस (आयटीबीपी) दलातील १२ महिला जवानांची तुकडी प्रथमच तैनात करण्यात आली आहे. एकूणच, भारत-चीन सीमेवर आता स्त्रीशक्तीचे दर्शन होणार आहे.
भारत-चीन यांच्यात विभागणार्‍या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील चौक्या उंच पर्वतराजींवर बांधण्यात आल्या आहेत. याठिकाणी १२ महिला जवानांचा समावेश असलेली तुकडी तैनात करण्यात आली आहे. आजवरच्या इतिहासात या सीमेवर महिला जवानांना तैनात करण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही तुकडी लडाखमधील लेह येथे सीमेचे रक्षण करणार आहे. विशेष म्हणजे, देशभरातील ५०० महिला जवानांमधून या १२ महिलांची देशरक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांना विशेष प्रशिक्षणही देण्यात आले आहे, अशी माहिती आयटीबीपीमधील एका वरिष्ठ अधिकार्‍याने वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
आयटीबीपीच्या २१ बटालियनचे कमांडर कुंदन प्रशाद म्हणाले की, आपली सर्वोत्तम सेवा देण्यासाठी या महिला जवानांना अतिशय खडतर प्रशिक्षण देण्यात आले आहे. कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी आता त्या पूर्णपणे सज्ज असून, पुरुषांच्या तुलनेत त्या कुठेही मागे नाहीत. अतिशय थंड आणि लहरी हवामानात या महिलांवर १४ हजार फूट उंचीवर सीमेच्या रक्षणाची जबाबदारी असणार आहे.
भारत-चीन सीमेच्या रक्षणासाठी आयटीबीपी या सीमादलाची २४ ऑक्टोबर १९६२ रोजी स्थापना करण्यात आली होती. लडाखमधील काराकोरम पासपासून अरुणाचल प्रदेशातील जॅकेब-ला या ३४८८ किमी सीमेचे संरक्षण करण्याची जबाबदारी या दलावर आहे. भारत-चीन सीमेवर ९ हजार ते १८,७०० फुटापर्यंत पर्वतरांगा आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28477

Posted by on May 25 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (274 of 2453 articles)


=प्रशांत भूषण यांचा हल्लाबोल= वॉशिंग्टन, [२४ मे] - दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संजोजक अरविंद केजरीवाल हे संधीसाधू आहेत. ...

×