Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » भारत दौर्‍यामुळे ६ तासांनी ओबामांचे आयुष्य घटले!

भारत दौर्‍यामुळे ६ तासांनी ओबामांचे आयुष्य घटले!

=अमेरिकन मीडियाचा दावा=
President Barack Obama Speaks at a Meeting of the Democratic Governors Associationनवी दिल्ली, [२८ जानेवारी] – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनासाठी खास पाहुणे म्हणून २५ जानेवारी ते २७ जानेवारी या दरम्यान भारतात आले होते. बराक ओबामा यांच्या भारत दौर्‍याचं आपल्या देशात सर्वत्र कौतुक सुरू आहे. मात्र अमेरिकेच्या मीडियानं अजब दावा केला आहे, त्याच्या मते या तीन दिवसीय भारत दौर्‍यामुळे ओबामांचं आयुष्य तब्बल सहा तासांनी घटले आहे.
दिल्लीमधल्या वायू प्रदूषणाचा उल्लेख करत अमेरिकन मीडियानं हा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. दिल्लीतील प्रदूषणामुळे ओबामांचे आयुष्यातले एका दिवसाला दोन तास म्हणजे एकूण सहा तास आयुष्य कमी झाले आहे. दिल्लीमध्ये प्रदूषणाची पातळी अधिक असल्याने ओबामांच्या प्रकृतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असेही त्यात म्हटले आहे. शिवाय ओबामांच्या आरोग्याला एका दिवसांत ८ सिगरेट्‌स पिऊन जेवढी हानी होत नाही, तेवढी दिल्लीतील प्रदूषणामुळे झाली, असे कँब्रिज विद्यापीठातील प्रदूषण विषयातील तज्ज्ञ डेव्हिड स्पीगलहॅल्टर याचं मत आहे.
विशेष म्हणजे ओबामांचा दौरा सुरू होण्याआधीच दिल्लीतल्या वायू प्रदूषणाबद्दल अमेरिकन अधिकार्‍यांनी चिंता व्यक्त केली होती. अमेरिकन दूतावासाकडून त्यासाठी तब्बल १८०० एअर प्युरिफायर्सही खरेदी करण्यात आले होते. दरम्यान, जगात कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करणार्‍या देशांच्या यादीत अमेरिका दोन नंबरवर आहे, तर भारताचा तिसरा क्रमांक आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20151

Posted by on Jan 29 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (2157 of 2458 articles)


चेन्नई, [२८ जानेवारी] - इस्लामिक स्टेट ऑफ सीरिया ऍण्ड इराक अर्थातच इसिस या जहाल दहशतवादी संघटनेने ‘दीनामलार’ या तामिळ वृत्तपत्राला ...

×