Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » भारत-पाक चर्चा वाचविण्याची धडपड

भारत-पाक चर्चा वाचविण्याची धडपड

=जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझरला अटक होणार=
Masood Azhar- Jaish-e-Mohammadनवी दिल्ली, [९ जानेवारी] – पठाणकोट वायुसेनेच्या तळावरील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर पणाला लगलेली पुढील आठवड्यातील भारत-पाकिस्तान विदेश सचिव पातळीवरील चर्चा वाचविण्यासाठी या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझरला अटक करण्याच्या दिशेने पाक सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.
पठाणकोट हल्ल्याच्या सूत्रधारांविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी भारत आणि अमेरिकेकडून पाकवर प्रचंड दबाव वाढला आहे. या हल्ल्यामुळे विदेश पातळीवरील चर्चा रद्द केली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आम्ही दिलेल्या पुराव्यांच्या आधारावर पाकने कारवाई केली नाही, तर विदेश सचिव स्तरावरील चर्चेसाठी आम्ही विदेश सचिव एस. जयशंकर यांना इस्लामाबादला पाठविणार नाही, अशी भूमिका अलीकडेच भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानेही विशद केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाहोरला भेट दिल्यानंतर दोन्ही देशांमध्ये विश्‍वासाचे वातावरण निर्माण झाले असतानाच, पठाणकोट हल्ल्यामुळे भारताच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, याची जाणीव पाकमधील राज्यकर्त्यांना विशेषत: पंतप्रधान नवाझ शरीफ यांना पुरती झाली आहे. या हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या मौलाना मसूदला अटक केल्यास पाक दहशतवादविरोधी लढ्यात खरोखरच भारतासोबत आहे, हे संकेत देणे शक्य होईल आणि भारताचा विश्‍वासही जिंकता येईल, हे ओळखून पाकने मसूदला अटक करण्यासाठी सर्व शक्यतांची पडताळणी सुरू केली आहे, अशी माहिती उच्चस्तरीय सूत्राने दिली. दरम्यान, पाकमधील या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील सूत्राने सांगितले की, हाफिझ सईदप्रमाणे अटकेचा देखावा आम्ही कदापि मान्य करणार नाही. पाकने भारतविरोधी कारवाया करणार्‍या त्यांच्या देशातील अतिरेक्यांविरोधात कठोर कारवाई करायलाच हवी, एवढीच आमची अपेक्षा आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26455

Posted by on Jan 10 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (935 of 2458 articles)


=पोलिस अधिकार्‍याला गोळ्या घातल्या= वैशाली, [९ जानेवारी] - बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या राजदच्या सत्तेतील वापसीसोबतच जंगलराजही प्रचंड बोकाळला आहे. अभियंते ...

×