Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » भारत-पाक सचिव चर्चा रद्द नाही

भारत-पाक सचिव चर्चा रद्द नाही

=अजित डोभाल यांची स्पष्टोक्ती=
ajit-dobhalनवी दिल्ली, [११ जानेवारी] – पंजाबच्या पठाणकोट येथील वायुसेनेच्या हवाई तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर भारत आणि पाकिस्तानच्या विदेश सचिवांमध्ये १४ व १५ जानेवारी रोजी आयोजित चर्चा रद्द झालेली नाही, अशी स्पष्टोक्ती भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी आज सोमवारी दिली.
पठाणकोट हल्ल्यात पाकमधीलच अतिरेक्यांचा हात असल्याचे ठोस पुरावे मिळाल्याने आणि ते सादर करूनही पाककडून कुठलीच कारवाई न झाल्याने ही चर्चा रद्द झाली असल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी प्रकाशित केले होते. या वृत्ताचे डोभाल यांनी स्पष्ट शब्दात खंडन केले.
मी कोणत्याही दैनिकाला अशा प्रकारची मुलाखत दिलेली नाही. चर्चा नियोजित तारखांनाच होणार असल्याने ती रद्द करण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही, असे त्यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26478

Posted by on Jan 12 2016. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (923 of 2453 articles)


=पठाणकोट हल्ला, आयएसआय, लष्करी अधिकार्‍यांचा समावेश= इस्लामाबाद, [११ जानेवारी] - पठाणकोट येथील वायुदलाच्या हवाई तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तानमधील दहशतवादी ...

×