Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » भारत मला घरासारखा वाटतो

भारत मला घरासारखा वाटतो

=बान की मून यांचे मत=
UN SECRETARY GENERAL MEETS WITH SPANISH PRESIDENTसंयुक्त राष्ट्रसंघ, [२७ जानेवारी] – भारत दौर्‍यातील आपल्या आठवणींना उजाळा देत, संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस बान की मून यांनी भारतातील वास्तव्याच्या काळात आपल्याला घरात राहिल्यासारखे वाटल्याचे सांगितले.
त्यांनी १९७२ मध्ये नवी दिल्लीतून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. ४३ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या कारकीर्दीत त्यांनी अनेकवेळा भारताला भेट दिली आहे. दिल्लीतील जुन्या राहत्या बंगल्याचा दूरध्वनी क्रमांक त्यांना अजूनही आठवतो. संयुक्त राष्ट्र संघाच्या २०१५ च्या महत्त्वाकांक्षी विकासाच्या योजनेत भारत महत्त्वपूर्ण भागीदार आहे. त्यांनी या महिन्याच्या सुरुवातीला नवी दिल्ली आणि गुजरातला भेट दिली होती. या वेळी साबरमती आश्रमाला दिलेल्या भेटीत बघितलेल्या महात्मा गांधींच्या पत्रांमुळे मला विशेष आनंद झाल्याचे ते म्हणाले.
महात्मा गांधी हे शांतिदूत, मानवतेचे पुढारी आणि गरिबांचे कैवारू होते, असे सांगत याच मुद्यांवर संयुक्त राष्ट्र संघाचा भर असल्याने मला भारत भेटीत घरच्यासारखे वाटल्याचे त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या संदेशात म्हटले आहे. ‘मी जेव्हा भारताला भेट देतो, त्यावेळी मी अतिशय आनंदी असतो. माझ्या राजकीय कारकीर्दीव्यतिरिक्त मला या देशाप्रती विशेष जिव्हाळा आहे,’ असे देखील ते म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20093

Posted by on Jan 28 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (2173 of 2458 articles)


=नवाज शरीफ यांची भूमिका= इस्लामाबाद, [२७ जानेवारी] - भारत आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या मैत्री संबंधाची पाकिस्तानने चांगलीच धास्ती घेतली आहे. ...

×