Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » भारत माता की जय म्हणतच राहणार: फडणवीस

भारत माता की जय म्हणतच राहणार: फडणवीस

=खुर्ची गेली तरी चालेल, माफी मागणार नाही=
devendra-fadnavis9मुंबई, [४ एप्रिल] – ‘माझे मुख्यमंत्रिपद गेले तरी बेहत्तर; पण मी भारत माता की जय म्हणणारच’ अशी गर्जना करून मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आज सोमवारी विधानसभेत विरोधकांना सणसणीत उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांनी भारत मातेच्या जयघोषाबद्दल केलेल्या विधानाचे सभागृहात तीव्र पडसाद उमटले. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने मुख्यमंत्र्यांना आपल्या विधानाबाबत माफी मागण्याची मागणी करीत आक्रमक पवित्रा घेतला. यावरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच खडाजंगी रंगली.
नाशिकच्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत आपण मुख्यमंत्री म्हणून भाषण केले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते म्हणून, असा सवाल पृथ्वीराज चव्हाणांनी विचारला. यावर सणसणीत उत्तर देताना संघात मला फक्त राष्ट्रवाद शिकवला. या देशाच्याविरोधात जे बोलले त्यांच्याविरोधात मी बोललो, तर माझे काय चुकले? असा प्रतिप्रश्‍न मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. मी आपल्या विधानावर ठाम आहे, असे म्हणत माझे पद गेले तरी चालेल, पण मी माफी मागणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. ज्यांना भारत माता की जय म्हणायचे नाही, त्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही, असे विधान काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्यावरून हा सर्व वाद रंगला आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, माझे भाषण आपण पूर्ण ऐकले असते, तर हा विषय निघालाच नसता. काही लोक जाणीवपूर्वक विभाजन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना या देशाविषयी प्रेम नाही. वाघा सीमेवर दोनच नारे असतात, एक भारत माता की जय आणि दुसरा वंदे मातरम्. भारत माता की जय हा धार्मिक मुद्दा नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी ठणकावले.
‘मी भारत माता की जय म्हणालो, म्हणून का माफी मागायची? अल्पसंख्यक समाजाची माफी तुम्ही मागितली पाहिजे. केवळ मतांचे राजकारण करता’ असे खडसावून सांगत ‘माझे मुख्यमंत्रिपद राहिले काय अथवा गेले काय, भारत माता की जय मी म्हणतच राहीन, असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27719

Posted by on Apr 5 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (522 of 2451 articles)


=मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती= मुंबई, [४ एप्रिल] - राज्य सरकारच्या नव्या कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून बेरोजगारांना गुणवत्ता असलेले कौशल्य ...

×