Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक » ‘भारत माता की जय’ सारेच विश्‍व म्हणू लागलेय, सक्तीची गरज नाही

‘भारत माता की जय’ सारेच विश्‍व म्हणू लागलेय, सक्तीची गरज नाही

=सरसंघचालकांची स्पष्टोक्ती=
dr.mohanbhagwatलखनौ, [२८ मार्च] – ‘आमचे भव्य राष्ट्रनिर्माण व यश पाहूनच ‘भारत माता की जय’ असे सारेच विश्‍व म्हणू लागले आहे. ही घोषणा कुणावरही लादण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्ट प्रतिपादन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. येथील चारबाग परिसरातील भारतीय किसान संघाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन करताना ते सोमवारी बोलत होते.
ते पुढे म्हणाले, आम्ही कुठलीही विचारसरणी दुसर्‍यावर थोपवू इच्छित नाही. स्वयंसेवकांनी स्वत: असा आदर्श निर्माण करावा की लोकांनीच आमच्या मार्गाने वाटचाल केली पाहिजे. आमच्या आचरणाने आम्हाला असा श्रेष्ठ भारत घडवायचा आहे की लोकांनीच आपणहून, स्वयंप्रेरणेनेच ‘भारत माता की जय’चा घोष केला पाहिजे. आपली जीवनपद्धती, आपले विचार दुसर्‍यावर लादण्याची काहीही आवश्यकता नाही.
आपल्या भाषणात सरसंघचालकांनी रा. स्व. संघाचा इतिहासही विशद करून सांगितला. ते म्हणाले, महान भारताच्या निर्मितीसाठी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले आहेत. आपण शेतकरी असोत अथवा दुसर्‍या कुठल्याही व्यवसायात, प्रत्येकाने समाजासाठी, राष्ट्रासाठी योगदान दिलेच पाहिजे. ‘वसुधैव कुटुम्बकम’ हेच आमचे तत्त्वज्ञान असून, या महान भारतीय संस्कृतीचे आम्ही पाईक आहोत. संपूर्ण जगासामेर आम्हाला उच्च आदर्श प्रस्थापित करायचा आहे, असेही सरसंघचालकांनी नमूद केले.
‘कमीत कमी प्रयत्नात अधिकाधिक धनप्राप्ती’ हे आजच्या काळात विशेष कौशल्याचे मानले जात असले तरी ही गोष्ट आदर्श म्हणता येणार नाही. आम्ही समाजाकडून जेवढे घेतो त्यापेक्षा अधिक समाजाला प्रदान केले पाहिजे. हेच आमच्या जीवनाचे उद्दिष्ट असले पाहिजे. ‘भारत माता की जय’ म्हणा असे आजकालच्या युवकांना सांगावे लागते, असे विधान सरसंघचालकांनी काही दिवसांपूर्वी केले होते.
यावर प्रतिक्रिया म्हणून एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी ‘मानेवर सुरी जरी ठेवली तरी भारत माता की जय म्हणणार नाही’ असे उद्गार काढले होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27624

Posted by on Mar 29 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक (555 of 2453 articles)


मुंबई, [२८ मार्च] - शासनाने डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत योजना १६ आदिवासी जिल्ह्यांमध्ये राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ...

×