Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » भारत याचवर्षी चीनला पछाडणार

भारत याचवर्षी चीनला पछाडणार

=आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा विश्‍वास=
india-china flagवॉशिंग्टन, [१० जुलै] – आर्थिक विकासाच्या स्पर्धेत भारत याचवर्षी चीनला पछाडणार असल्याचा विश्‍वास आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केला आहे. झपाट्याने उदयास येत असलेली अर्थव्यवस्था म्हणूनच नव्हे, तर अन्य विकसनशील देशांना आदर्श वाटावा, एवढ्या गतीने भारताची समृद्धीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे नाणेनिधीने आपल्या ताजा अहवालात म्हटले आहे.
नाणेनिधीने गुरुवारी सायंकाळी आपला अहवाल प्रकाशित केला. यावर्षी भारताच्या आर्थिक विकासाचा दर ७.५ टक्के इतका राहणार असल्याचे यात नमूद आहे. तिथेच, चीनचा आर्थिक विकास ६.८ टक्के या गतीने होणार असल्याचे नाणेनिधीने म्हटले आहे. त्याचप्रमाणे, २०१६ मध्येही भारताचा विकास दर ७.५ टक्के इतकाच कायम राहणार असून, चीनच्या विकासदरात मात्र घसरण होऊन तो ६.३ टक्क्यांपर्यंत कमी होईल, असा नाणेनिधीचा अंदाज आहे.
नाणेनिधीने आपल्या अहवालात यावर्षी जागतिक अर्थव्यवस्थेच्या एकूण विकासाचा दर ३.३ टक्के इतका राहणार असल्याचे भाकीत केले आहे. २०१४ च्या तुलनेत हा दर किंचित कमी असेल. पुढील आर्थिक वर्षात हा दर ३.८ टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. प्रगत देशांची अर्थव्यवस्था आणखी मजबूत होईल, तर विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थेला मंदीचा फटका सहन करावा लागेल, असेही अहवालात नमूद आहे.
उदयास येत असलेल्या काही देशांच्या अर्थव्यवस्थांना वस्तूंच्या कमी किमती आणि विदेशी कर्जाच्या जाचक अटी यासह अनेक घटकांचा सामना करावा लागणार आहे. याच घटकांचा फटका चीनच्या अर्थव्यवस्थेलाही बसणार आहे, असेही नाणेनिधीचे मत आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23364

Posted by on Jul 11 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (1573 of 2458 articles)


=मीडियावरील वादग्रस्त आदेश मागे= नवी दिल्ली, [१० जुलै] - दिल्ली सरकार, मुख्यमंत्री, मंत्री तसेच आम आदमी पार्टीच्या प्रतिमेला धक्का पोहोचविणार्‍या ...

×