Home » ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य » भारत सीमेजवळ दिसला सईद

भारत सीमेजवळ दिसला सईद

Hafiz_Saeed1जम्मू, [५ जानेवारी] – लष्कर-ए-तोयबा या पाकस्थित अतिरेकी संघटनेचा प्रमुख व २६/११ च्या मुंबई अतिरेकी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिझ सईद याने नुकतीच भारतीय सीमेजवळच्या भागाला भेट दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
भारत-पाक सीमेला लागून असलेल्या या भागात सईदने भेट देण्याची ही पहिली वेळ नाही. गेल्यावर्षीही त्याने आंतरराष्ट्रीय सीमेवरील अनेक भागांना भेट दिली होती आणि जाहीर सभा घेऊन भारतविरोधी आगही ओकली होती. शनिवारी रात्रीच्या सुमारास चार-पाच वाहनांमधून ५० ते ६० समर्थकांसह सईद भारतीय सीमेजवळ पोहोचला आणि त्याने त्या भागाची पाहणी केल्याचे गुप्तचर संस्थांच्या अहवालात म्हटले आहे. यावेळी तो पाकिस्तानी लष्कराच्या सुरक्षेतच तिथे आला होता, असेही सांगण्यात येत आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19482

Posted by on Jan 6 2015. Filed under ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य (2278 of 2452 articles)


=राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय= मुंबई, [५ जानेवारी] - वेगवेगळ्या कारणांसाठी राजकीय व सामाजिक आंदोलने केल्यामुळे आंदोलनकर्त्यांवर दाखल झालेले व प्रलंबित असलेले ...

×