Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक » भारत हिंदूराष्ट्र!, सक्षम करण्याची गरज

भारत हिंदूराष्ट्र!, सक्षम करण्याची गरज

=स्वांत रंजन यांची भूमिका=
swant ranjan-rssनागौर, [९ मार्च] – फार पूर्वीपासूनच हिंदू राष्ट्र म्हणून भारताची ओळख आहे. त्यामुळे भारताला आणखी सक्षम बनविण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देश उभारणीत आणि देशाला सक्षम बनविण्यात नेहमीच योगदान दिले आहे. आपल्याला संघाचे स्वयंसेवक होण्याची संधी मिळाली, हे आपले सौभाग्यच आहे. स्वयंसेवक म्हणून भारताला बळकट करण्यासोबतच हिंदू समाजालाही संघटित करण्याचे काम आपल्याला करायचे आहे, असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख स्वांत रंजन यांनी येथे केले.
रा. स्व. संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेतर्फे मंगळवारी आयोजित ‘स्वयंसेवक संगम-२०१६’ मध्ये स्वांत रंजन बोलत होते. ते म्हणाले की, ईश्‍वरीकार्य करण्याचे माध्यम आपण झालो आहोत. आपण सक्षम आहोत. आपली सक्षमता समाजसेवेसाठी आहे. त्यामुळे प्रत्येक स्वयंसेवकांनी प्राणपणाला लावून समाजाची सेवा करायला हवी.
या कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, जोधपूर प्रांत संघचालक ललित शर्मा तसेच स्वदेशी जागरण मंचाचे राष्ट्रीय संयोजक भगवती प्रकाश यांच्यासह स्वयंसेवक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27175

Posted by on Mar 10 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक (714 of 2453 articles)


=सुप्रीम कोर्टाचा सवाल, केंद्राकडून मागविले उत्तर= नवी दिल्ली, [९ मार्च] - धूम्रपान केल्याने किंवा तंबाखूजन्य उत्पादकांचे सेवन केल्याने कर्करोग होतो, ...

×