Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » भारत होणार जागतिक महासत्ता

भारत होणार जागतिक महासत्ता

  • वैश्‍विक अर्थव्यवस्थेत भारत आशेचा किरण =
  • ७.२ टक्के गतीने विकास =
  • आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा निर्वाळा =

imf-building-International Monetary Fundनवी दिल्ली, [१६ मार्च] – संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था डळमळीत झाली असताना, केवळ भारतातच आशेचा किरण दिसत आहे. विद्यमान आर्थिक वर्षात भारताचा विकास दर ७.२ टक्के इतका राहील. इतकेच काय, तर २०१९ पर्यंत जपान आणि जर्मनीचा एकत्रिपणे जो विकास दर असेल, त्यापेक्षा जास्त विकास दर एकट्या भारताचा राहील आणि येत्या काही वर्षात भारत जागतिक महासत्ता होईल, असा विश्‍वास आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रबंध संचालिका ख्रिस्तिन लेगार्ड यांनी आज सोमवारी येथे व्यक्त केला.
संपूर्ण जगावरच आर्थिक मंदीचे सावट पसरले आहे. पण, भारताने मात्र आशेचा किरण कायम ठेवला आहे. भाजपाप्रणीत रालोआ सरकारने अलीकडील काळात जे धोरणात्मक निर्णय घेतले आणि व्यावसायिकांच्या मनात विश्‍वास वाढविण्यासाठी जी पावले उचलली, त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होण्यात झाला आहे, असे लेगार्ड यांनी येथील श्रीराम महाविद्यालयात आयोजित समारंभात बोलताना सांगितले.
आर्थिक प्रगतीच्या क्षेत्रात भारताची अतिशय वेगाने वाटचाल सुरू आहे. चालू आर्थिक वर्षाकरिता ७.२ टक्के विकास दराची अपेक्षा ठेवायला काहीच हरकत नाही. पुढील वर्षीचा विकास दर ७.५ टक्क्यांच्या घरात राहू शकतो. यामुळे जगात सर्वात गतीने विकास करणारा देश, अशीच भारताची ओळख होणार आहे. आगामी पाच वर्षांनंतर म्हणजेच २०१९ पर्यंत भारताचा एकट्याचा विकास दर जपान आणि जर्मनीपेक्षा जास्त राहील. शिवाय रशिया, ब्राझील आणि इंडोनेशिया या तीन गतीने विकास करीत असलेल्या देशांनाही भारत मागे टाकेल, असे त्यांनी विश्‍वासाने सांगितले.
आर्थिक मंदीमुळे अनेक देशांचा विकास खोळंबला आहे. विकासाकडे त्यांची संथ गतीने वाटचाल सुरू आहे. पण, भारतातील चित्र वेगळेच दिसत आहे. हा देश जलद गतीने विकास करीत आहे. याच वर्षी चीनलाही मागे टाकून नजीकच्या काळात दुहेरी विकास दर साध्य करणे भारताला फार अवघड जाणार नाही. २०३० पर्यंत जगातील सर्वात लोकप्रिय आणि शक्तिशाली देश म्हणून भारताचा उदय झालेला असेल, असेही लेगार्ड म्हणाल्या.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21509

Posted by on Mar 17 2015. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1897 of 2453 articles)


=सीबीआयचा आणखी एक खळबळजनक खुलासा= नवी दिल्ली, [१६ मार्च] - कॉर्पोरेट हेरगिरी प्रकरणाचा तपास करणार्‍या सीबीआयने आज सोमवारी आणखी एक ...

×