Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » भारत ८-९ टक्के दराने विकास करू शकतो

भारत ८-९ टक्के दराने विकास करू शकतो

=आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मत=
International Monetary Fund -IMFवॉशिंग्टन, [१२ मार्च] – आपल्या पायाभूत आराखड्यात काही धोरणात्मक बदल केल्यास येणार्‍या काही वर्षांमध्ये भारत ८ ते ९ टक्के वार्षिक दराने आर्थिक विकास करू शकतो, असे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) व्यक्त केले आहे.
येणार्‍या काळात भारत ८ ते ९ टक्के वार्षिक दराने विकास करू शकणार नाही असे कोणतेच कारण आम्हाला दिसत नाही. परंतु, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी निश्‍चितच वेळ लागेल, असे आयएमएफचे आशिया व प्रशांत विभागाचे सहायक संचालक आणि भारतासाठीचे मिशन प्रमुख पॉल कॅशिन यांनी बुधवारी येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. आमच्याकडे अजून काही वर्ष आहेत आणि पायाभूत सुधारणांची आम्ही पाठराखण करत राहू. व्यावसायिकांसाठी अनुकूल आणि विकास दर वाढविणार्‍या उपायांवर भर दिला पाहिजे, असे भारतातून कॉन्फ्रेस कॉलमध्ये सहभागी असलेले आयएमएफचे वरिष्ठ स्थानिक प्रतिनिधी टॉम रिचडर्‌‌सन यांनी सांगितले.
लेगार्ड पुढील आठवड्यात भारतात
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख (आयएमएफ) ख्रिस्तिन लेगार्ड पुढील आठवड्यात भारत दौर्‍यावर येणार असून, आपल्या या दौर्‍यात त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेण्याची शक्यता आहे. लेगार्ड येत्या १६ मार्च रोजी दिल्लीत असतील. त्यानंतर १७ मार्चला त्या देशाची आर्थिक राजधानी मुंबईला भेट देतील. या दौर्‍यात त्यांची एकदोन भाषणं होणार आहेत, असे कॅशिन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. लेगार्ड अर्थमंत्री अरुण जेटली यांनाही भेटण्याची शक्यता असली तरी त्यांच्या दौर्‍याची अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21306

Posted by on Mar 13 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (1934 of 2458 articles)


=अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ऍशटन कॉर्टर यांचे मत= वॉशिंग्टन, [११ मार्च] - इराक आणि सीरियात उच्छाद मांडलेल्या आयएसआयएस या दहशतवादी संघटनेविरोधात अमेरिकेने ...

×