Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » भुजबळांचा १६० कोटींचा भूखंड जप्त

भुजबळांचा १६० कोटींचा भूखंड जप्त

Chagan-Bhujbal2मुंबई, [१३ नोव्हेंबर] – राज्यासह देशभरात दिवाळीची धामधूम सुरू असतानाच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याचा आरोप असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांना जोरदार दणका देत त्यांच्या कंपनीच्या नावे असलेला १६० कोटींचा भूखंड जप्त केल्यामुळे भुजबळांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.
छगन भुजबळ यांच्या देविशा कन्स्ट्रक्शन कंपनीच्या नावे असलेला हा भूखंड नवी मुंबईच्या खारघर परिसरात आहे. अंमलबजावणी संचालनालयाने अवैध सावकारी प्रतिबंधक कायद्यानुसार ही धडक कारवाई केली आहे. जप्त करण्यात आलेल्या भूखंडाची किंमत तब्बल १६० कोटी रुपये आहे. हेक्स वर्ल्ड या प्रस्तावित निवासी इमारतीशी संबंधित प्रकरणातील हा भूखंड आहे. या प्रस्तावित निवासी संकुलात २३०० लोकांचे भवितव्य पणाला लागले होते. छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज आणि पुतण्या समीर यांनी या भूखंडाच्या माध्यमातून ४४ कोटी रुपये जमा केल्याचा आरोप आहे. शेजारच्या भूखंड मालकाशी काही वाद झाल्यामुळे ही इमारत पूर्ण होऊ शकली नाही आणि हे प्रकरण न्यायालयात गेले होते.
ईडीने १५ सप्टेंबरला छगन भुजबळ यांच्यासह १९ जणांविरोधात फेमा अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या भूखंडाचे मूल्यांकन करण्यात आले आणि आता ईडीने भूखंड जप्तीची कारवाई केली आहे. नवी दिल्लीच्या महाराष्ट्र सदनाच्या बांधकामातही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप असून, त्याविषयी भुजबळांची चौकशी सुरू आहे. ईडीच्या या कारवाईमुळे भुजबळांच्या अडचणीत भर पडली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25424

Posted by on Nov 14 2015. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (1246 of 2451 articles)


=व्यंकय्या नायडू यांचे विरोधकांना आवाहन= बंगळुरू, [१३ नोव्हेंबर] - विरोधकांनी सहिष्णुता दाखविली आणि संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनाचे कामकाज सुरळीत चालू ...

×