Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » भुजबळांची ५५ कोटींची संपत्ती सील

भुजबळांची ५५ कोटींची संपत्ती सील

=साखर कारखाना, २९० एकर जमिनीवर टाच, ईडीची धडक कारवाई=
Chagan-Bhujbal3मुंबई, [२१ मार्च] – राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात आणि महाराष्ट्रातील अनेक प्रकल्पांच्या अंमलबजावणीतील घोटाळ्याच्या आरोपात अटक झालेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंगे्रसचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याविरुद्ध धडक कारवाई करताना अंमलबजावणी संचालनालयाने आज सोमवारी भुजबळ यांचा साखर कारखाना आणि २९० एकर प्राईम जमिनीवर टाच आणली. आजच्या बाजारभावानुसार या दोन्ही संपतीची किंमत ५५ कोटी रुपये असून, ईडीच्या या कारवाईमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
बेकायदेशीर सावकारी प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत ईडीने भुजबळांची संपत्ती सील करण्याचा आदेश जारी केल्यानंतर ईडीच्या एका पथकाने लगेच ही कारवाई केली. भुजबळ यांच्या मालकीच्या आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीची ही संपत्ती आहे, अशी माहिती ईडीच्या वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.
याशिवाय भुजबळांच्याच मालकीच्या गिरणा साखर कारखान्याला सील ठोकून या कारखान्याच्या परिसरातील मोकळी जागाही ईडीने ताब्यात घेतली आहे. ईडीला तपासात असे आढळून आले की, कर्ज वसुली लवादाने २०१० मध्ये हा कारखाना लिलावात काढला असता, भुजबळांच्या कंपनीने हा कारखाना केवळ २७ कोटी रुपयांमध्ये खरेदी केला होता. प्रत्यक्षात या कारखान्याची किंमत त्यापेक्षाही कितीतरी जास्त होती. महाराष्ट्र सदनासह विविध घोटाळ्यांतून जमा केलेल्या रकमेतून भुजबळ यांनी या दोन्ही संपत्ती खरेदी केल्या होत्या.
ईडीने भुजबळांच्या संपत्तीवर टाच आणण्याची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी ईडीने भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीय सदस्यांची चल आणि अचल अशा दोन्ही मिळून एकूण २८० कोटींची संपत्ती जप्त केली आहे.
छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना ईडीने विविध घोटाळ्यांप्रकरणी अटक केली असून, दोघेही सध्या ऑर्थर रोड कारागृहात बंद आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27519

Posted by on Mar 22 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (591 of 2451 articles)


=भाजपा नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट= नवी दिल्ली, [२१ मार्च] - उत्तराखंडमधील राजकीय पेचप्रसंगाबाबत भाजपाच्या प्रतिनिधीमंडळाने आज सोमवारी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती ...

×