Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » भुजबळांना दोन दिवसांची कोठडी

भुजबळांना दोन दिवसांची कोठडी

=तपासात सहकार्य करीत नसल्याचा ईडीचा आरोप=
Chagan-Bhujbal2मुंबई, [१५ मार्च] – राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या नूतनीकरणात तसेच अन्य ११ प्रकल्पांमध्ये घोटाळे करून सुमारे ८७० कोटी रुपयांची बेहिशेबी संपत्ती जमा केल्याचा आरोपात सोमवारी अटक करण्यात आलेले राष्ट्रवादी कॉंगे्रसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची स्थानिक न्यायालयाने आज मंगळवारी दोन दिवसांच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत रवानगी केली.
भुजबळ यांना आज दुपारनंतर सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन न्यायालयाच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तत्पूर्वी, भुजबळ यांची सेंट जॉर्ज रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. अटक केल्यानंतर सोमवारची रात्र भुजबळ यांनी ईडीच्या कार्यालयातच घालविली होती.
भुजबळांविरुद्ध आमच्याकडे ठोस पुरावे असतानाही, ते तपासात सहकार्य करीत नसल्याने त्यांना आमच्या कोठडीत देण्यात यावे, असा जोरदार युक्तिवाद ईडीच्या वतीने करण्यात आला. तर, केवळ राजकीय सुडापोटीच आपल्यावर निराधार आरोप ठेवण्यात आले, असा युक्तिवाद भुजबळांच्या वतीने करण्यात आला.
गेल्या १५ वर्षांच्या काळात छगन भुजबळ राज्यात मंत्री म्हणून विविध पदांवर होते. या काळात त्यांनी आपल्या पद व अधिकारांचा गैरफायदा घेत अमाप बेहिशेबी संपत्ती जमा केली, असा आरोपही ईडीच्या वकिलांनी न्यायालयात केला. त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतांबद्दल संशय असून, त्यांच्याकडून झालेल्या आर्थिक व्यवहारातील दस्तावेजही समाधानकारक नाही, असेही ईडीने न्यायालयात सांगितले. संपूर्ण सत्य बाहेर काढण्यासाठी त्यांची चौकशी आवश्यक आहे. पण, ते सहकार्य करीत नसल्याने त्यांची कोठडीच आवश्यक असल्याचेही ईडीने स्पष्ट केले.
ईडीचा युक्तिवाद फेटाळून लावताना केवळ राजकीय सुडापोटीच आपल्याला लक्ष्य केले जात असल्याचा आरोप भुजबळांकडून करण्यात आला. समीर आणि पंकज भुजबळ यांच्या सर्वच व्यवहारांची माहिती आपल्याला नाही. त्यामुळे त्याबद्दल माहिती देऊ शकत नाही, असे भुजबळ यांनी न्यायालयात सांगितले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने भुजबळ यांना दोन दिवसांसाठी ईडीच्या कोठडीत पाठविले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27360

Posted by on Mar 16 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (644 of 2451 articles)


सहकार सुधारणा विधेयकाला विधानसभेची मंजुरी राज्य सहकारी बँकेसह अनेक जिल्हा बँकांचा समावेश मुंबई, [१५ मार्च] - अनियमित कामकाजामुळे सहकारी ...

×