Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » भूकंपाने हादरले वायव्य पाकिस्तान

भूकंपाने हादरले वायव्य पाकिस्तान

=५.५ इतकी तीव्रता, नागरिकांमध्ये प्रचंड दहशत=
Pakistan_Map1पेशावर, [२८ एप्रिल] – नेपाळ आणि भारत सलग तीन दिवस महाविनाशी भूकंपाने हादरल्यानंतर आज मंगळवारी वायव्य पाकिस्तानच्या काही भागांनाही भूकंपाचा हादरा बसला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ५.५ इतकी होती.
वायव्य सरहद्दीतील खैबर पख्तुनख्वा प्रांतातील पेशावर, मलकांद आणि स्वात खोर्‍यातील बहुतांश भागांना या भूकंपाचे झटके बसले, असे वेधशाळेच्या अधिकार्‍याने सांगितले. या भूकंपात कोणत्याही प्रकारच्या प्राणहानी किंवा संपत्ती हानीची माहिती नसली, तरी भूकंपाच्या झटक्यानंतर लोक भयभीत होऊन आपापल्या घराबाहेर धावत सुटले आणि त्यांनी सुरक्षित ठिकाण गाठले. नेपाळ आणि भारतातील महाविनाश अजूनही डोळ्यापुढे असल्याने पाकच्या या भागांमधील नागरिकांमध्येही प्रचंड भीती निर्माण झाली होती. रविवारी सायंकाळीच खैबर पख्तुनख्वा प्रांताला वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाचा फटका बसला होता. यात ४५ जणांचा बळी गेला असून, १५० पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहे. अनेकांचे घरेही उद्‌ध्वस्त झाली आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22379

Posted by on Apr 29 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1739 of 2458 articles)


=कामकाज तीनदा स्थगित= नवी दिल्ली, [२८ एप्रिल] - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कॅनडा आणि जर्मनीच्या दौर्‍यात केलेल्या विधानावरून राज्यसभेत ...

×