Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » भूमी अधिग्रहणावर नवा अध्यादेश

भूमी अधिग्रहणावर नवा अध्यादेश

=राज्यसभेचे कामकाज संस्थगित करणार=
rajyasabhaनवी दिल्ली, [२७ मार्च] – भूमी अधिग्रहण अध्यादेशाची मुदत संपत असताना आणि विरोधकांच्या प्रखर विरोधामुळे अल्पमतात असलेल्या राज्यसभेत विधेयक पारित करणे अशक्य असल्याचे लक्षात घेऊन सरकारने भूमी अधिग्रहणावर नव्याने अध्यादेश जारी करण्याचा आणि राज्यसभेचे कामकाज संस्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
येत्या ५ एप्रिल रोजी भूमी अधिग्रहणावरील अध्यादेशाची मुदत संपणार आहे. त्यातच आता संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाचा पहिला टप्पा संपला आहे. दुसर्‍या टप्प्यातील कामकाज २० एप्रिलपासून सुरू होत आहे. अशा स्थितीत नव्याने अध्यादेश जारी करणे हाच एकमेव पर्याय असल्याचे सरकारचे ठाम मत झाले आहे. याच अनुषंगाने आज शुक्रवारी संसदीय कामकाजावरील कॅबिनेटच्या बैठकीत सरकारने राज्यसभेचे कामकाज तत्काळ प्रभावाने संस्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
भूमी अधिग्रहणावर सरकार नवा अध्यादेश केव्हा जारी करणार का, असे विचारले असता, याबाबतचा जेव्हा निर्णय घेण्यात येईल, त्याबाबतची माहिती तुम्हाला लगेच मिळेल, असे नायडू यांनी सांगितले. गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत नायडू, सुषमा स्वराज आणि मुख्तार अब्बास नकवी आदी मंत्री उपस्थित होते. या बैठकीत अर्थमंत्री अरुण जेटली सहभागी झाले नसले, तरी या मुद्यावर सर्व मंत्र्यांनी त्यांच्यासोबत आधीच चर्चा केली होती.
राज्यसभेचे कामकाज तूर्तास संस्थगित करण्यात आले आहे, ते पुन्हा बोलावले जाईल. २० एप्रिलपासून संसद अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. भूमी अधिग्रहण विधेयक सभागृहात सादर करण्यापूर्वी आम्ही सर्वच राजकीय पक्षांना सहकार्य मागणार आहोत. हे विधेयक एकमताने पारित व्हावे, असे आम्हाला मनापासून वाटते, असे नायडू यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21777

Posted by on Mar 28 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (1838 of 2453 articles)


=विदर्भ विकास महामंडळात ४९०० कोटीचा निधी अखर्चित, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची माहिती= मुंबई, [२७ मार्च] - भाजपा-सेना युती सरकारने ...

×