Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » भूमी अधिग्रहण विधेयकावर महाभारत होणार

भूमी अधिग्रहण विधेयकावर महाभारत होणार

=कॉंग्रेसचा इशारा=
JAIRAM_RAMESHनवी दिल्ली, [६ एप्रिल] – केंद्र सरकारच्या भूमी अधिग्रहण विधेयकावरून आता आणखी एक महाभारत होणार आहे. या लढ्यात आपण शेतकरी आणि आदिवासींच्या हितासाठी प्रामाणिकपणे लढा देत आहेत, हे बिजदसारख्या पक्षांना सिद्ध करावे लागणार आहे, असा इशारा कॉंग्रेस पक्षाने आज सोमवारी दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वागणे महाभारतातील दुर्योधनासारखेच आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात ज्या उद्योजकांनी मोदी यांना पैसा पुरविला, त्यांना खुश करण्यासाठी पंतप्रधानांनी आता शेतकर्‍यांचे हितही पणाला लावले आहे. कारण, या उद्योगांना आपल्या पैशावर लाभांश म्हणून शेतकर्‍यांच्या जमिनी हव्या आहेत, असा आरोप माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यंानी पत्रकारांशी बोलताना केला.
सरकारने भूमी अधिग्रहणावर नव्याने अध्यादेश जारी केला असून, राष्ट्रपतींनीही त्यास मंजुरी दिली आहे. हे विधेयक जेव्हा राज्यसभेत सादर होईल, तेव्हा बिजू पटनायक यांच्या पक्षाने प्रखर विरोध करावा, असे आमचे आवाहन आहे. शेतकरी व आदिवासींबाबत बिजद खरोखरच गंभीर आहे, हे सिद्ध करणारीच ही संधी असल्याचे रमेश यांनी सांगितले.
एमएमडीआर कायद्यावर बिजदने संसदेत सरकारला पाठिंबा दिल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी पटनायक यांचे आभार मानले होते. त्यामुळे भाजपा आणि बिजद यांच्यातील छुपे संबंध उघड झाले आहेत, असा आरोप करताना बिजदला आपला प्रामाणिकपणा सिद्ध करण्यासाठी आता आणखी एक संधी मिळाली असल्याने पटनायक यांनी जागे व्हावे आणि भूमी अधिग्रहणावरील अध्यादेशाला राज्यसभेत विरोध करावा, असे आवाहन त्यांनी केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21912

Posted by on Apr 7 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1816 of 2453 articles)


=संदीप दीक्षित यांचे मत= नवी दिल्ली, [६ एप्रिल] - राहुल गांधी यांच्याकडे कॉंग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे सोपविण्याची जय्यत तयारी सुरू असतानाच, कॉंग्रेस नेते ...

×