Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » भूमी अधिग्रहण विधेयक शेतकर्‍यांच्या हिताचेच

भूमी अधिग्रहण विधेयक शेतकर्‍यांच्या हिताचेच

=सरकार राबविणार देशव्यापी मोहीम: अरुण जेटली=
arun jaitley8बंगळुरू, [४ एप्रिल] – संपुआ सरकारच्या काळात तयार झालेले भूमी अधिग्रहण विधेयक शेतकर्‍यांचे हित साधणारे नव्हते. पण, त्यात सुधारणा करून भाजपाप्रणीत रालोआ सरकारने जे विधेयक तयार केले आहे, ते पूर्णपणे शेतकर्‍यांच्या हिताचे असून, या विधेयकावर सरकार देशव्यापी मोहीम हाती घेणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज शनिवारी येथे दिली.
भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या दोन दिवसीय बैठकीचा समारोप झाल्यानंतर अरुण जेटली पत्रपरिषदेला संबोधित होते. शेतकर्‍यांच्या तसेच सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाप्रणीत रालोआ सरकारने जो पुढाकार घेतला, त्याला भाजपाचा संपूर्ण पाठिंबा असल्याचेही जेटली यांनी सांगितले.
रालोआ सरकारने जे भूमी अधिग्रहण विधेयक आणले आहे, ते ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास करणारे असून, प्रस्तावित औद्योगिक कॉरिडॉर्समुळे भूमिहीन आणि दलितांसह सर्वच ग्रामीणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. विरोधी पक्ष स्वत:च्या फायद्यासाठी या विधेयकाविरोधात अपप्रचार करीत असून, तो धुडकावून लावण्यासाठी तसेच या मुद्यावर सरकारची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आम्ही लवकरच देशव्यापी अभियान राबविणार आहोत, असे जेटली म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21900

Posted by on Apr 6 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1820 of 2453 articles)


मुंबई/कोची, [४ एप्रिल] - येमेनमध्ये अस्थिरता माजली असताना भारत सरकारने आपल्या नागरिकांसाना मायदेशी परत येण्याचे आवाहन केल्यानंतर या आवाहनाला प्रतिसाद ...

×