Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » भूसंपादन विधेयकाच्या पार्श्‍वभूमीवर नक्षली हल्ला

भूसंपादन विधेयकाच्या पार्श्‍वभूमीवर नक्षली हल्ला

=वरिष्ठ मंत्र्यांनी उच्चस्तरीय बैठकीत घेतला आढावा=
Parliament-L-REनवी दिल्ली, [१२ एप्रिल] – सध्या परदेश दौर्‍यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनुपस्थितीत रालोआ सरकारच्या वरिष्ठ मंत्र्यांच्या आज रविवारी झालेल्या बैठकीत शनिवारी छत्तीसगडमध्ये झालेला नक्षली हल्ला, संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाचा दुसरा टप्पा आणि वादग्रस्त भूसंपादन विधेयकाच्या पार्श्‍वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या सरकारी निवासस्थानी पार पडलेल्या या बैठकीला अर्थमंत्री अरुण जेटली, परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, भूपृष्ठ परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद हे वरिष्ठ मंत्री उपस्थित होते, असे अधिकृत सूत्राने याबाबत माहिती देताना सांगितले. माओवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ले करण्याच्या वाढत्या घटना लक्षात घेता छत्तीसगड सरकारला सर्वतोपरी मदत करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. देशाच्या अंतर्गत सुरक्षेला अजूनही मोठे आव्हान असलेल्या माओवादी समस्येबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
येत्या २० एप्रिलपासून संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू होत असून, राज्यसभेत भूसंपादन विधेयकासह अधिवेशनात येणार्‍या संभाव्य अडचणींबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. सध्या फ्रान्स, जर्मनी आणि कॅनडा या तीन देशांच्या दौर्‍यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनुपस्थितीत पार पडलेली ही बैठक सुमारे दीड तास चालली, असेही सूत्राने सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21976

Posted by on Apr 13 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (1803 of 2453 articles)


वॉशिंग्टन, [१२ एप्रिल] - अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिटंन यांच्या पत्नी व माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिटंन यांनी पुढील वर्षी ...

×